Oscar 2025: ऑस्कर 2025 साठी भारताची धुरा "लापता लेडीज" च्या हातात

Laapataa Ladies For Oscar: लापता लेडीजला ऑस्करसाठी परदेशी चित्रपट श्रेणीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी
Laapataa Ladies For Oscar:लापता लेडीजला ऑस्करसाठी परदेशी चित्रपट श्रेणीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी
Laapataa Ladies Nomination Dainik Gomantak
Published on
Updated on

Lapata Ladies Nominated For Oscar 2025

भारतीय चित्रपट सृष्टीसाठी आजचा दिवस खास ठरला. आमिर खान आणि किरण राव यांनी दिग्दर्शित केलेला 'लापता लेडीज' या चित्रपटाला भारतीय फिल्म फेडरेशनने 2025 मध्ये होणाऱ्या ऑस्करसाठी परदेशी चित्रपट श्रेणीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे.

किरण राव आणि ज्योती देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. अट्टम, ऍनिमल यांसारख्या अजून 29 नामांकनांमधून लापता लेडीज या चित्रपटाला ही अनोखी संधी मिळाली आहे.

लापता लेडीज या चित्रपटामध्ये नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन यांच्यासह नवीन कलाकार आहेत. स्नेहा देसाई यांच्या पटकथा आणि संवादासह हा चित्रपट बिप्लब गोस्वामी यांच्या पुरस्कार विजेत्या कथेवर आधारित आहे.

लपता लेडीज या चित्रपटाला अनेकांकडून पसंत केलं गेलं, आणि आता या चित्रपटाला आंतराष्ट्रीय स्थरावर भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.

Laapataa Ladies For Oscar:लापता लेडीजला ऑस्करसाठी परदेशी चित्रपट श्रेणीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी
Goa Art: कॉमर्समधून पदवी घेतलेल्या आशिषचा चित्रकारापर्यंतचा प्रवास, कला क्षेत्रात आर्थिक स्थैर्य असते का?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com