Kriti Senon Speak About Adipurush Film: आदिपुरुष सिनेमाबाबत काय म्हणाली परम सुंदरी?

Kriti Senon: अभिनेत्री क्रिती सेनन पहिल्यांदाच आदिपुरुष सिनेमाविषयी माध्यमांसमोर बोलली.
Adipurush Film
Adipurush FilmDainik Gomantak
Published on
Updated on

Kriti Senon: 'आदिपुरुष' या बिग बजेट सिनेमाचा जेव्हापासून टीजर रिलीज झाला तेव्हापासून हा सिनेमा कोणत्या ना कोणत्या वादात अडकला आहे. साऊथ सुपरस्टार प्रभास, सैफ अली खान, क्रिती सेनन अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा ओम राऊतने दिग्दर्शित केला आहे. काही दिवसांपुर्वी हिंदू महापरिषदेने आदिपुरुष सिनेमावर आक्षेप घेतला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता आदिपुरुष सिनेमाची अभिनेत्री क्रिती सेननने पहिल्यांदाच यावर भाष्य केले आहे.

Kriti Senon
Kriti SenonDainik Gomantak

अभिनेत्री क्रिती सेनन आपल्या एका मुलाखतीत याविषयी बोलताना म्हणाली, 'आदिपुरुष सिनेमाचा जो टीजर समोर आला तो खूप छोटा आहे. आतापर्यंत फक्त 1 मिनिट 35 सेकंडचा टीजर रिलीज झालाय. या सिनेमात अजुन खूप काही आहे. यामध्ये आपला इतिहास आणि धर्म नव्या पद्धतीने मांडण्यात आला आहे.'

Adipurush
AdipurushDainik Gomantak
Adipurush Film
गोव्यात IFFI 53 ग्रॅंड तयारी; CM प्रमोद सावंतांकडून पाहणी

पुढे क्रिती सेनन म्हणाली की, 'आम्हा सर्वांची उत्तम काहीतरी करण्याची ईच्छा होती. आमच्याकडे आपला इतिहास जाणून घेण्याची, आपल्या धर्माला जगासमोर मांडण्याची ही उत्तम संधी होती. ही एक अशी गोष्ट आहे, ज्याचा आपल्या सगळ्यांना खूप अभिमान आहे. या कथेला चांगल्या पद्धतीने मांडण्याची गरज होती. प्रभास (Prabhas), मी, आम्ही सगळ्यांनी हे करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे,' असं क्रिती (Kriti Sanon) म्हणाली.

Prabhas
PrabhasDainik Gomantak

यावेळी आदिपुरुष सिनेमाची रिलीज डेट पुढे का ढकलण्यात आली? असा प्रश्नही तिला विचारण्यात आला. त्याबाबत क्रिती सेनन (Kriti Sanon) म्हणाली की, 'आमचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी म्हणल्याप्रमाणे हा सिनेमा सर्वांच्या अभिमानाची गोष्ट आहे. खूप मोठ्या लेवलवर साकारण्यात येणारी ही भव्यदिव्य फिल्म आहे. हा इतिहासाचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे हा सिनेमा चांगल्याप्रकारे प्रदर्शित झाला पाहिजे. त्यावर थोडे काम सुरु आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com