
Konkona Sen Amol Parashar photos: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि अभिनेता अमोल पाराशर हे सध्या त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. काही आठवड्यांपूर्वी त्यांच्या 'ग्राम चिकित्सालय' या शोच्या स्क्रिनिंगदरम्यान ते एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता हे दोघेही आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत, ज्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
दोघांच्या एका मित्राने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून ते सध्या व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये सर्व पुरुष एकत्र उभे आहेत, तर दुसऱ्यामध्ये सर्व महिला एकत्र दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका नेटकऱ्याने लिहिले, "कोंकणा आणि अमोल पाराशर त्यांच्या पहिल्या कौटुंबिक सहलीचा आनंद घेत आहेत.
अमोल आणि कोंकणाला एकत्र पाहून नेटकरी खूप आनंदी आहेत. एका चाहत्याने लिहिले, "ते दोघे खूप गोंडस आहेत! मी त्यांच्यासाठी खूप आनंदी आहे." एका दुसऱ्या चाहत्याने त्यांना गोव्यामध्ये भेटून आपला अनुभव शेअर केला. तो म्हणाला, "मला गोव्यात त्यांची अचानक भेट झाली. खऱ्या आयुष्यात कोंकणा खूप सुंदर आहे आणि तिचा बॉयफ्रेंडही खूपच क्यूट आहे."
ही जोडी त्यांच्यातील वयाच्या अंतरामुळेही चर्चेत आहे. अमोल १७ सप्टेंबर रोजी त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे, तर कोंकणा या वर्षी डिसेंबरमध्ये ४६ वर्षांची होईल. या दोघांमध्ये सात वर्षांचे अंतर आहे. अमोल आपला वाढदिवस साजरा करण्यासाठीच गोव्यात असल्याचे सांगितले जातेय. चाहत्यांना आता ते दोघेही त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करतील, अशी अपेक्षा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.