'शोले' चित्रपटामधील 'हे' किस्से तुम्हाला माहिती आहेत का ?

धर्मेंद्र यांना शोले चित्रपटामध्ये ठाकूरची भूमिका करायची होती.
Sholay
SholayDainik Gomantak

शोले (Sholay) हा चित्रपट रमेश सिप्पी यांनी दिगदर्शित केलेला चित्रपटसृष्टीमधील ऐतिहासिक चित्रपट आहे. शोले या चित्रपटाने चित्रपटसृष्टीला नवी दिशा दिली आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, धर्मेंद्र ,संजीव ठाकूर , हेमा मालिनी यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटामधील प्रत्येक डायलॉग आजसुद्धा चाहत्यांच्या ओठांवर आहे. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त शोलेच्या अशाच काही गोष्टी जाणून घेउया ज्या अनेक लोकांना माहिती नाहीत.

* हा चित्रपट सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी लिहिला होता, जे त्यावेळी सलीम -जावेद या नावाने चित्रपट लिहीत असत. यासाठी त्यांना १० हजार रुपये देण्यात आले. १९७० च्या दशकात हि मोठी रक्कम होती.

* धर्मेंद्र यांना चित्रपटामध्ये ठाकूरची भूमिका करायची होती. चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर त्याना वाटले कि त्याची कथा ठाकूर आणि गब्बर यांच्याबोवती फिरते. रमेश सिप्पी यांनी अतिशय हुशारीने कथा सादर केली. रमेश सिप्पी यांनी धर्मेंद्र यांना सांगितले कि, जर संजीव कुमार यांनी वीरूची भूमिका केली तर ते शेवटी हेमा मालिनीसोबत असतील. त्यावेळी धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्यावर प्रेम करत होते. दुसरीकडे संजीव कुमार यांनी हेमाला आधीच प्रपोज केलं होते. त्यांना हेमा मालिनीसोबत अधिक वेळ घावण्याची संधी मिळाली असती.

Sholay
शाहरुख खानने इजिप्शियन चाहत्याला पाठवली खास भेट

* हि गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे कि जयच्या भूमिकेत शत्रुघ्न सिन्हा हि पहिली पसंती होती, जी नंतर अमिताभ बच्चन यांनी केली.

* चित्रपटाच्या एक सीनमध्ये जया बच्चन दिवा लावतात तर अमिताभ बच्चन माऊथ ऑर्गन वाजवतात ते शूट करण्यासाठी २० दिवस लागले होते. खरे तर रमेश सिप्पी आणि सिनेमॅटोग्राफर द्वारका यांना दिव्याच्या सीनमध्ये सूर्यास्त आणि रात्रीच्या मधली काही मिनिटे चित्रपटामध्ये दाखवायची होती.

* सलीम खान यांनी जयच्या पात्रासाठी अमिताभ बच्चन यांचे नाव सुचवले. जंजीर चित्रपटादरम्यान सलीम खान यांनी अमिताभ बच्चन यांची भेट घेतली होती. त्याचवेळी धर्मेद्र यांनी अमिताभ यांच्या नावाची शिफारस केली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com