भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायक किशोर कुमार (Kishore Kumar) यांचा आज वाढदिवस आहे. किशोर कुमार यांनी 1500 चित्रपटांमध्ये गाणे (Song) गायली आहेत. आजसुद्धा लोक त्यांची गाणी आवडीने एकतात. किशोर कुमार एक उत्तम गायक असण्याबरोबरच लेखक(Writer), निर्माता (Producer) आणि पटकथा लेखक (Screenwriter) देखील होते. पण त्यांच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणेच (Professional life) त्यांचे वैयक्तिक जीवन (Personal life) देखील खूप चर्चेत होते. किशोर कुमार (Kishore Kumar) यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेवुया त्यांच्या जीवनाशी संबंधित काही गोष्टी.
मध्य प्रदेशात झाला होता जन्म
किशोरदाचा जन्म 4 ऑगस्ट 1929 मध्ये मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यात झाला. किशोर कुमारचे यांचे खरे नाव आभासकुमार गांगुली. परंतु त्यांना खरी ओळख किशोर कुमार या नावाने मिळाली. किशोर कुमार आपल्या वैयक्तिक जीवनात बिनधास्त व्यक्तिमत्व होते. आज किशोर कुमार आपल्यासोबत नसले तरी त्यांच्या आठवणी लोकांच्या हृदयात कायम जिवंत आहेत.
करिअरची सुरुवात
किशोर कुमार यांनी आपल्या करियरची सुरुवात 1946 साली केली. त्यांनी 'शिकारी' या चित्रपटातून आपल्या करियरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्यांचा मोठा भाऊ अशोक कुमार मुख्य भूमिकेत होता. तसेच या दोन्ही भावांनी 'भाई-भाई', 'दूर का राही', 'चलती का नाम गाडी' आणि 'बंदी' या चित्रपटात एकत्र काम केले.
किशोर कुमारचे यांचे प्रोफेशनल जीवन जितके यशस्वी होते तितकेच त्यांचे वैयक्तिक जीवन गुंतागुंतीचे होते. किशोर कुमार यांनी एकूण चार लग्न केले होते. त्यांचे चौथे लग्न लीला चंद्रवरकर यांच्याशी झाले. त्यांची चौथी पत्नी त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान होती. चौथ्या लग्नाच्यावेळी ते 51 वर्षाचे होते. लीला चंद्रवरकर आणि किशोर कुमार हे दोघे 'प्यार अजनबी है' च्या सेटवर भेटले आणि तिथूनच त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली. त्यांनी पहिले लग्न रुमा घोष, दुसरे लग्न मधुबाला, तिसरे लग्न योगिता बाली आणि चौथे लग्न लीला चंद्रवरकर यांच्याशी केले. परंतु योगिता बालीने किशोर कुमारपासून वेगळे झाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांच्याशी लग्न केले.
किशोर कुमारांनी चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी संगीताचे शिक्षण घेतले नव्हते. त्यांनी आपल्या कार्यकिर्दीत 1500 हुन अधिक गाणी गायली आहेत. किशोर कुमार यांचे मोठे भाऊ अशोक कुमार यांनी एका माध्यमाशी बोलतांना सांगितले की किशोर कुमार लहानपणी खूप बेसुर गायचे. त्यांचा आवाज आवाज खूप वाईट होता, परंतु किशोरने चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केल्यानंतर या गोष्टीवर विश्वास ठेवणे खरोखर कठीण आहे.
ते इंग्लिश गाण्यांचे देखील फॅन होते
किशोर कुमार यांचा मुलगा अमीत कुमार यांनी सोशल मिडियावर बोलतांना सांगितले की, माझ्या वडिलांना इंग्लिश गाणी देखील ऐकण्यास आवडत होती. त्यांनी सांगितले की किशोर कुमार यांना इंग्लिश 'क्लासिक' चित्रपट देखील पाहायला आवडत होते. एकदा तर त्यांनी अमेरिकेतून अनेक 'वेस्टर्न' चित्रपटांच्या कॅसेट आणल्या. याशिवाय ते केएल सहगल या गायकाचे मोठे चाहते होते. किशोर कुमार यांना नेहमीच त्यांच्यासारखे गायक व्हायचे होते.
किशोर कुमार यांच्या मोठ्या भावाच्या 76 व्या वाढदिवशी निधन झाले. असे म्हटले जाते की किशोर कुमार यांना चित्रपट क्षेत्रात आणणार त्यांचे मोठे भाऊ अशोक कुमारच होते. वयाच्या 57 व्या वर्षी किशोर कुमार यांनी या जगाचा निरोप घेतला. असे म्हटले जाते की किशोर कुमार यांना आपल्या भावापेक्षा जास्त पैसे कमवायचे होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण देखील झाले. 70 ते 80 दशकात किशोर कुमार हे सर्वात जास्त पैसे कमवणारे गायक होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.