चाहत्यांसाठी खुशखबर! KGF लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

KGF Chapter 2 चे डिजिटल अधिकार OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime ने विकत घेतले आहेत.
KGF 2 OTT Release on Amazon Prime
KGF 2 OTT Release on Amazon PrimeDainik Gomantak
Published on
Updated on

सुपरस्टार यशचा 'KGF Chapter 2' हा चित्रपट रोज नवा इतिहास रचत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या कमाईचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सध्या तो चित्रपटगृहांमध्ये व्यस्त आहे, परंतु जर तुम्हाला हा चित्रपट पाहण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर सर्वांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. (KGF 2 will now be released soon on the Amazon Prime OTT platform)

KGF 2 OTT Release on Amazon Prime
RBIची क्रेडिट कार्ड कंपन्यांसाठी नवीन नियमावली; आता करू शकणार नाहीत हे काम

KGF 2 कोणत्या OTT वर प्रदर्शित होणार?

माहितीनुसार, KGF Chapter 2 चे डिजिटल अधिकार OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime ने विकत घेतले आहेत. सुपरस्टार यशचा हा चित्रपट हिंदी, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि तमिळ भाषांमध्ये Amazon Prime Video वर स्ट्रीम केला जाईल. त्यामुळे आता सगळेजण घरबसल्या या चित्रपटाचा आनंद घेऊ शकाल.

दिग्दर्शक प्रशांत नील दिग्दर्शित KGF Chapter 2 27 मे पासून Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ओटीटी रिलीजबाबत अधिकृत विधान जारी केलेले नाही. हा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याची माहिती आहे.

KGF Chapter 2ने रिलीजच्या सातव्या दिवशीही हिंदी भाषिक राज्यांमध्ये आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. गुरुवारी चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बाहुबली 2' चित्रपटाचा विक्रमही मोडला, ज्याने रिलीजच्या पहिल्या सात दिवसांत बॉक्स ऑफिसवर 246 कोटी रुपयांची कमाई केली. 'KGF 2' ने रिलीजच्या सातव्या दिवशी 250 कोटींच्या कलेक्शनसह 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com