गोमंतकीयांसाठी खास पर्वणी! प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्तींचा गोवा दौरा, वाचा सविस्तर माहिती

Pankh Musical Concert Goa: कौशिकी चक्रवर्ती त्यांची 'PANKH' मैफल गोव्यात आयोजित करण्यात येणार, याबाबतची माहिती
pankh concert schedule goa
pankh concert schedule goaDainik Gomantak
Published on
Updated on

Kaushiki Chakraborty Concert in Goa: प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी आपल्या मधुर आवाजाने जगभरातील रसिकांना मंत्रमुग्ध केलेय आणि आता त्यांची 'PANKH' मैफल गोव्यात आयोजित करण्यात येणार असून, याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे दिलीये. या पोस्टमध्ये त्यांनी गोव्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या असून, गोव्याला 'संस्कृती, रंग आणि कलेचा एक जिवंत कॅनव्हास' म्हटलेय.

"गोव्याच्या भूमीत समुद्र गातो"

कौशिकी चक्रवर्ती यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "गोव्याच्या भूमीत जिथे समुद्र गातो, आकाश प्रेरणा देते आणि प्रत्येक गल्लीत संस्कृतीचा सुगंध दरवळतो. गोव्याला कलेबद्दलची असलेली आवड आणि भारतीय शास्त्रीय संगीताशी असलेले नाते आजही कायम आहे, ही एक अशी परंपरा आहे जी आत्म्याला स्पर्श करते." गोव्याच्या याच नैसर्गिक सौंदर्याने आणि सांस्कृतिक वारशाने भारावून त्यांनी गोव्यात मैफल सादर करण्याचा निर्णय घेतलाय.

त्यांनी 'PANKH' या मैफिलीला त्यांनी केवळ एक कार्यक्रम न म्हणता, 'कथा आणि सुरांनी विणलेली एक सफर' असे म्हटले आहे. ही मैफल दिग्गज आवाजांना विनम्र अभिवादन आहे, ज्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या कृपेने आपल्याला मार्गदर्शन केलेय आणि आजही ते प्रेरणा देत आहेत. या मैफिलीत त्यांची वैयक्तिक संगीतमय सफर आणि त्यांच्या वडिलांच्या घराण्याचा समृद्ध वारसा दिसून येईल.

pankh concert schedule goa
Goa Classical Music: ‘स्मरण पूर्वसूरींचे’! शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत फातर्फेकर रममाण झाले

तिकीटाबद्दल माहिती

या संध्याकाळी संगीत थेट आत्म्याला स्पर्श करेल, असे आवाहन करत त्यांनी गोव्यातील संगीतप्रेमींना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिलेय. हा मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता, रवींद्र भवन, वास्को येथे होणार आहे. या मैफिलीची तिकिटे 'डिस्ट्रिक्ट' या संकेतस्थळावर आता उपलब्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com