Amitabh Bachchan यांना कॉलेजमध्ये डान्स करण्याची नव्हती परवानगी, बिग बींचा KBC 14 मध्ये खुलासा

Amitabh Bachchan On His Collage Days: क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती 14' मध्ये मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या महाविद्यालयीन दिवसातील एक किस्सा शेअर केला आहे.
Amitabh Bachchan
Amitabh BachchanDainik Gomantak
Published on
Updated on

सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा क्विझ रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' हा नेहमीच प्रेक्षकांचा आवडता शो राहिला आहे. हा शो सुरू झाल्यापासून, तिसरा सीझन वगळता त्याचे सर्व सीझन बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत. त्यांच्या होस्टिंगमुळे या शोची शान अधिक वाढते. अमिताभ बच्चन यांचे फॅन खुप आहेत. जेव्हा अमिताभ बच्चन त्यांच्या आयुष्याशी निगडीत खुलासे करतात तेव्हा गमतीशीर प्रश्नोत्तरे होतात तेव्हा चाहते खूप उत्साहित होतात.

22 ऑगस्ट 2022 रोजी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी स्पर्धक ऐश्वर्या रुपारेलचे स्वागत केले. रुपारेल हे व्यवसायाने डेटिस्ट आहेत. गजोधर चाची या नावाने इंस्टाग्राम रील्ससाठी देखील ओळखले जातात. बिग बींनी खेळाशी संबंधित सर्व नियम स्पर्धकांना सांगितले आणि गेम सुरू केला. या खेळाच्या मध्यभागी बिग बी यांना त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीचे आणि कॉलेजचे दिवस आठवले.

Amitabh Bachchan
विरुष्काची स्कूटरवरुन मुंबईत भटकंती, Video Viral

* अमिताभ बच्चन यांना नाचण्याची परवानगी का नव्हती?

बॉलिवूडचे शहेनशाह म्हणुन ओळख असलेले अमिताभ बच्चन गेली अनेक दशके इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. मात्र तुम्हाला माहित आहे का की, कॉलेजच्या दिवसांमध्ये त्यांना डान्स करण्याची परवानगी नव्हती. अमिताभ बच्चन यांनी KBC 14 मधील एका संवादात याचा खुलासा केला आहे. त्याने ऐश्वर्या रुपारेलसोबत कॉलेजचा किस्सा शेअर करताना सांगितले की, त्यांना कॉलेजमध्ये डान्स करण्याची फारशी परवानगी नव्हती. त्यावेळी कॉलेजमध्ये बॉल रूम डान्स व्हायचा.

* मुंबई लोकलने प्रवास करायचे

अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला विचारले, तिला मुंबईत (Mumbai) काय आवडते? यावर ऐश्वर्या म्हणाली की, तिला मुंबई लोकल खूप आवडते? ऐश्वर्याने पुढे सांगितले की, तिने कॉलेजची ४ वर्षे अशीच घालवली आणि तिची एक वेगळीच दुनिया झाली आहे. यानंतर अमिताभ यांनी त्यांच्या संघर्षमय दिवसांचा खुलासा केरत सांगितले की, त्यांनीही करिअरच्या सुरुवातीच्या काळात मुंबई लोकलने प्रवास केला. सीट उपलब्ध नसल्याने अनेकवेळा ते लोकलमध्ये लटकुन गेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com