Kartik Aaryan: 'माझी रेंज थोडी वाढली' असं म्हणत अभिनेत्याने शेअर केले नव्या महागड्या गाडीचे फोटो

Kartik Aaryan: या कारसोबत ही चौथी कार कार्तिकच्या लक्झरी गा़ड्यांमध्ये समाविष्ट झाली आहे.
Kartik Aaryan
Kartik AaryanDainik GomanTAK

Kartik Aaryan shares photo suv range rover

गेल्या काही दिवसांपासून भूल भूलैय्या ३ या चित्रपटामुळे अभिनेता कार्तिक आर्यन हा मोठ्या चर्चेत आहे. आता मात्र हा अभिनेता नवीन घेतलेल्या कारमुळे मोठ्या चर्चेत आहे. कार्तिक आर्यन हा आपल्या महागड्या गाड्यांसाठी प्रसिद्ध आहे.

आता अभिनेत्याने एक एसयूव्ही ( SUV ) रेंज कार खरेदी केले आहेत. ही कार खरेदी केल्यानंतर त्याने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. गाडीच्या ट्रंकमधला आपल्या पाळीव कुत्र्यासोबत फोटो शेअर करताना 'आमची रेंज आता थोडी वाढली आहे,' अशा आशयाचे कॅप्शन दिले आहेत.

कार्तिकच्या रेंज रोव्हर एसयूव्हीचा रंग बॉटल ग्रीन असून या लक्झरी कार( Car )ची बाजारातील किंमत 4.94 कोटी ते 6 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. या कारसोबत ही चौथी कार कार्तिकच्या लक्झरी गा़ड्यांमध्ये समाविष्ट झाली आहे.

Kartik Aaryan
Kartik AaryanSocial Media

या नवीन रेंज रोव्हर व्यतिरिक्त कार्तिक आर्यनकडे लॅम्बोर्गिनी, मॅक्लारेन आणि पोर्श सारख्या महागड्या कार आहेत. चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तर प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान यांनी 'उत्तम निवड' असे म्हणत कार्तिकचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून 'भूल भुलैया 3' मुळे कार्तिक आर्यन सातत्याने चर्चेत असतो. या चित्रपटाच्या शूटिंगच्या काही झलकही कार्तिकने सोशल मीडिया( Social Media )वर शेअर केल्या आहेत. आता हा चित्रपट कधी रिलिज होणार याची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com