SatyaPrem Ki Katha
SatyaPrem Ki KathaTwitter

रोमँटिक अंदाजात दिसले कार्तिक-कियारा, 'SatyaPrem Ki Katha' चित्रपटाचा पहिला लूक रिलीज

कार्तिक आर्यन आता पुन्हा एकदा नव्या अंदाजात दिसणार आहे. त्याच्या 'सत्य प्रेम की कथा' या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
Published on

बॉलीवूड स्टार कार्तिक आर्यनचा मागील चित्रपट भूल भुलैया बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. यासह, कार्तिक 2022 मधील अशा काही अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. कार्तिक आर्यन आता पुन्हा एकदा नव्या अंदाजात दिसणार आहे. त्याच्या 'सत्य प्रेम की कथा' या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत शेरशाह अभिनेत्री कियारा अडवाणीही दिसणार आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर आणि फर्स्ट लूक शेअर केला आहे.

कार्तिक-कियारा एकत्र दिसणार

नुकताच कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या 'सत्य प्रेम की कथा' या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती. चाहते देखील कार्तिक आर्यनच्या पुढच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. या पोस्टरमध्ये कार्तिक आणि कियारा रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. दोघेही एकमेकांना मिठी मारत आहेत. त्याचवेळी, चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करताना, 'सत्तू आणि कथा. आजपासून प्रेमाची कहाणी सुरू होत आहे, असे कार्तिक कॅप्शन कार्तीकने या पोस्टला दिले आहे.

SatyaPrem Ki Katha
Kriti Sanon Bday: कार्तिक आर्यनने शेअर केली बर्थ-डे गर्लसाठी क्युट पोस्ट
SatyaPrem Ki Katha
Kartik Aaryan:कार्तिक आर्यनने 'कॉफी विथ करण'ला का केले टार्गेट?

नुकतेच एका मीडिया इंटरव्यू दरम्यान कार्तिक आर्यन नेपोटिझमसह सर्व मुद्द्यांवर बोलला. तो म्हणाला की तो अजूनही इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करतो. जेव्हा खूप गरज असते तेव्हाच मी बिझनेस क्लासने प्रवास करतो. जेव्हा लोक पैसे कमवू लागतात तेव्हा ते इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करणे बंद करतात पण मी तसे केले नाही. माझीही काही स्वप्ने होती आणि अजूनही आहेत. चित्रपटसृष्टीत मला साथ देणारे कोणी नाही, असे म्हणत चित्रपट क्षेत्रात येताना झालेला त्रासही त्याने शेअर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com