Kareena Kapoor: अन् बेबो झाली विक्रांत मेस्सीची फॅन; कौतुकानंतर अभिनेता म्हणाला 'आता मी रिटायर ...'

Kareena Kapoor: या भूमिकेसाठी नुकताच विक्रांत मेस्सीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
Kareena Kapoor
Kareena KapoorDainik Gomantak
Published on
Updated on

Kareena Kapoor: विक्रांत मेस्सीचा 12th फेल हा चित्रपट थिएटरनंतर आता ओटीटीवरदेखील धुमाकूळ घालताना दिसत आहे. विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला चाहत्यांबरोबरच मोठ्या कलाकारांकडूनदेखील वाहवा मिळताना पाहायला मिळत आहे.

Disney Plus Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलिज झाला असून करिनाने हा चित्रपट पाहिल्यानंतर विक्रांत मेस्सीचे कौतुक केले आहे. करिना आपल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत या चित्रपटातील दिग्दर्शक आणि कलाकार यांची नावे लिहत त्यांना लिजेंड म्हटले आहे. आता करिनाने केलेल्या कौतुकामुळे विक्रांत मेस्सीला चांगलाच आनंद झाला असून त्याने करिनाची ही स्टोरी रिपोस्ट करत, 'आता मी रिटाअर होऊ शकतो, तुम्हाला आइडिया नाही की तुम्ही माझे कौतुक करणे माझ्यासाठी किती अर्थपूर्ण आहे.' असे विक्रांत मेस्सीने म्हटले आहे.

12th फेल या चित्रपटानंतर विक्रांत मेस्सीचे नाव सर्वत्र ऐकू येत आहे. आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात विक्रांतने आपली व्यक्तिरेखा अशा प्रकारे निभावली आहे की सगळेच त्याचे चाहते झाले आहेत. या भूमिकेसाठी नुकताच विक्रांत मेस्सीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

'12वी फेल' रिलीज झाल्यापासून सगळेच चित्रपटाचे आणि विक्रांतचे कौतुक करत आहेत. अगदी आनंद महिंद्रा यांनीही विक्रांत मॅसीचे कौतुक केले होते. चित्रपटातील इतर कलाकार मेधा शंकर, अनंत व्ही जोशी आणि अंशुमन पुष्कर यांच्याही अभिनयाची वाहवा होताना दिसत आहे.

Kareena Kapoor
Kareena Kapoor Social Media

विक्रांत मेस्सी हा करिनाचा मोठा चाहता आहे. दोघांनी नुकतीच एकत्र एक मुलाखत दिली, ज्यामध्ये विक्रांतने करिनाचे कौतुक केले. '12वी फेल' बद्दल बोलायचे तर, तो ऑक्टोबर 2023 मध्ये थिएटरमध्ये रिलीज झाला आणि काही काळानंतर तो OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर रिलीज झाला. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनीही संपूर्ण टीमचे कौतुक केले. 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 66 कोटींची कमाई केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com