पुन्हा गरोदर आहे करीना कपूर खान? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

करीना कपूर खानचे बेबी बंप दिसणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
karina kappor khan roumors
karina kappor khan roumorsDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. पती सैफ अली खान, मुलं तैमुर आणि जेह यांच्यासोबतचे फोटो करीना कपूरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या करीनाचे फोटो आणि पोस्ट चाहते आवडीने पाहतात, शेअर करतात. पण अशातच करीना कपूरचा एक असा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमुळे तिचे चाहते देखील गोंधळलेले दिसत आहे. या फोटोत करीनाचा बेबी बंप दिसत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोवरून करीना पुन्हा एकदा गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. (kareena kapoor khan pregnancy roumors baby bump photo goes viral)

करीना कपूर (kareena kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्यासोबत या व्हेकेशनला तिची बहीण करिश्मा कपूर, मैत्रीण अमृता अरोरा देखील आहेत. करिश्मा कपूर, अमृता अरोरा या दोघींनीही सोशल मीडियावर खूप सारे फोटो शेअर केले आहेत. ज्यात सर्वजण सुट्ट्या एन्जॉय करत असताना दिसत आहेत. तर शेअर केलेल्या फोटोंमध्ये करीना कपूर तिच्या कुटुंबासोबत खूप चांगला वेळ घालवताना दिसत आहे. पण अशातच करीना कपूरचा एक फोटो ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत असताना दिसत आहे. या फोटोमध्ये ती सैफ आणि आणखी एका व्यक्तीसोबत दिसत आहे. या फोटोमध्ये तिचा बेबी बंप दिसत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. .

karina kappor khan roumors
पंजाबी गाण्यावर करीना कपूर कशी डान्स करते ? वरुण धवनने दिले उत्तर

करीना कपूरच्या या फोटोमुळे तिचे चाहतेही गोंधळात पडले आहेत. या फोटोत ब्लॅक टँक टॉपमध्ये करीना कपूरचा बेबी बंप दिसत असल्याचं चाहत्यांचा म्हणणं आहे. त्यामुळे करीना कपूर तिसऱ्यांदा गरोदर असल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर कमेंट करत अनेकांनी तिला पुन्हा गरोदर आहे का? असा प्रश्न केला आहे. सोशल मीडियावर करीना पुन्हा एकदा गरोदार असल्याच्या चर्चांना चांगलंच उधाण आलं. मात्र यावर करीना, सैफ किंवा तिच्या कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

karina kappor khan roumors
तैमूर आणि जहांगीर यांच्या ट्रोलिंगवर करीना झाली व्यक्त

करीना कपूर आणि तिच्या फ्रेंड्सनी या व्हेकेशनचे फोटो शेअर सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि हे फोटो पाहता करीना खरंच गरोदर असल्याचा अंदाज चाहते लावताना दिसत आहेत. कारण यातील जवळपास सगळ्याच फोटोमध्ये करीना कुठेतरी मागे उभी असलेली किंवा सैल कपडे घातलेली किंवा पोट लपवताना दिसत आहे. याच कारणांमुळे चाहत्यांनी करीना कपूर खान पुन्हा गरोदर असल्याचा अंदाज लावला आहे. दरम्यान करीनाच्या कामाबद्दल बोलायचं असेल तर ती लवकरच ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात अमीर खान सोबत दिसणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

karina kappor khan roumors
लाल सिंग चड्ढाच्या तिसऱ्या गाण्यात बघायला मिळाली आमिर-करीनाच्या अप्रतिम प्रेमाची झलक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com