करण जोहरने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या सेटवरील फोटो केला शेअर

याआधी रणवीर आणि आलियाची जोडी जोया अख्तरच्या 'गली बॉय' चित्रपटात दिसली होती.
करण जोहरने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या  सेटवरील फोटो केला शेअर
Published on
Updated on

अभिनेत्री आलिया भट्टने 14 एप्रिलला रणबीर कपूरसोबत लग्न केले. लग्नानंतर 4-5 दिवसांनीच अभिनेत्री कामावर परतली. काही दिवसांपूर्वी आलिया भट्ट मुंबईच्या विमानतळावर दिसली होती. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती जैसलमेरला गेली होती. (Karan Johar shares photo)

करण जोहरने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या  सेटवरील फोटो केला शेअर
आलिया भट्टबद्दल बोलताना दिग्दर्शक एसएस राजामौली म्हणाले...

शनिवारी संध्याकाळी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून ती मुंबईत परतली. चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहरने सेटवरील एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये रणवीर सिंग, करण आणि नवविवाहित आलिया भट्ट मिठी मारताना दिसत आहेत.

करण जोहरने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, "ही आपल्या सर्वांसाठी रॉकी हग आहे, रॉकी आणि राणीची लव्हस्टोरी, तुम्हाला लवकरच ऐकायला मिळेल." फोटोमध्ये रणवीर सिंगने प्लेन व्हाइट टी-शर्ट घातल्याचे दिसत आहे. आलिया भट्टने गोल्डन आणि ब्लॅक शेड्स असलेला प्लेन ब्लॅक टी-शर्ट घातला आहे. त्याचवेळी, करण जोहरने लाल प्रिंटचा ओव्हरसाईज शर्ट घातला आहे.

Karan Johar
Karan Johar Dainik Gomantak
करण जोहरने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या  सेटवरील फोटो केला शेअर
Viral video: रणबीर कपूरच्या शूटचा व्हिडिओ लीक

याआधी रणवीर आणि आलियाची जोडी जोया अख्तरच्या 'गली बॉय' चित्रपटात (Movie) दिसली होती. तो चित्रपट चाहत्यांना चांगलाच आवडला होता. या दोघांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. याशिवाय आलिया आणि रणवीर करण जोहरच्या 'तख्त'मध्येही दिसणार आहेत. यात करीना कपूर (Kareena Kapoor), जान्हवी कपूर, विकी कौशल हे कलाकार देखील असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com