करण जोहरने शेअर केली 'Shah Rukh Khan' च्या 'वानार अस्त्र' ची झलक

शाहरुख खान रणबीर-आलियाच्या ब्रह्मास्त्र चित्रपटातही दिसणार आहे.
Shah Rukh Khan
Shah Rukh KhanDainik Gomantak
Published on
Updated on

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होत आहे. प्रत्येक दिवसनेदिवस लोकांमध्ये याची क्रेझ वाढत आहे. ब्रह्मास्त्रमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स (Bollywood Stars) दिसणार आहेत. त्यापैकी एकामध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानही झळकणार आहे. शाहरुख ब्रह्मास्त्रमध्ये वानर अस्त्राच्या भूमिकेत दिसणार आहे. अलिकडेच करण जोहरने चाहत्यांना शाहरुखच्या पात्राची झलक दिली आहे. करण जोहरने चाहत्यांना वानर अस्त्राची ओळख करून दिली आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये वानर अस्त्र फाईटिंग सीन करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चेहरा दिसत नसला तरी तो दुसरा कोणी नसून शाहरुख खान असल्याचे व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना समजले आहे. व्हिडिओ शेअर करत करण जोहरने लिहिले- वानर अस्त्राची शक्ती 8 दिवसांनी दिसेल. या व्हिडिओमध्ये (Video) वानर अस्त्र एका भिंतीकडे धावत येतो आणि फायरबॉलला लाथ मारतो. जी दुसऱ्या बाजूला कोणावर तरी पडते.

Shah Rukh Khan
Sidhu Moose Wala च्या मृत्यूनंतर आणखी एका पंजाबी गायकाचे ऑस्ट्रेलियात निधन

* चाहत्यांमध्ये वाढली उत्सुकता
शाहरुख खानचा चेहरा दिसत नसला तरी चाहत्यांना त्याच्या शरीरावरून समजले की तो शाहरुख खान आहे. अभिनेते नमिश चक्रवर्ती यांनी टिप्पणी केली – 'शाहरुख खान'. त्याचवेळी एका चाहत्याने लिहिले - 'हा खरोखर शाहरुख खान आहे. लीक झालेले फोटो अगदी छान होते.

ब्रह्मास्त्रच्या (Brahmastra) टीमकडून शाहरुखच्या कॅमिओबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अलीकडेच मौनी रॉयने एका मुलाखतीत शाहरुख खानच्या कॅमिओची पुष्टी केली आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली- या चित्रपटाचा भाग बनून मला खूप आनंद होत आहे. रणबीर, आलिया, बच्चन सर, नागार्जुन सर आणि शाहरुख सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com