Lock Upp: कंगना म्हणाली, 'मी माझ्या बापाचे कधी ऐकले नाही तर...

कंगना रणावत (Kangana Ranaut) तिच्या वादग्रस्त वक्तव्यसाठी सतत चर्चेत असते. अनेकदा ती मुलाखतीमधून बॉलिवूडमधील काही खास कलाकारांना टार्गेट करत असते.
Kangana Ranaut
Kangana RanautDainik Gomantak
Published on
Updated on

कंगना रणावत तिच्या वादग्रस्त वक्तव्यसाठी सतत चर्चेत असते. अनेकदा ती मुलाखतीमधून बॉलिवूडमधील काही खास कलाकारांना टार्गेट करत असते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कंगना पुन्हा एकदा भडकली आहे. आगामी रिअ‍ॅलिटी शो 'लॉकअप' च्या प्रमोशनदरम्यान पत्रकारांशी बोलताना कंगना (Kangana Ranaut) म्हणाली, 'मी बॉलिवूडमधील (Bollywood) मोठ्या दादा लोकांची कधीच पर्वा केली नाही.' दरम्यान लोक तिच्या या वक्तव्याचा संबंध करण जोहरशी (Karan Johar) जोडून पाहू लागले आहेत. (Kangana Said I Have Never Heard What My Father Said)

मी लहानपणापासूनच अशी आहे

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत मीडियाशी बोलताना एका प्रश्नाच्या उत्तरात कंगना म्हणाली की, 'मी माझ्या वडिलांचे कधी ऐकले नाही, तर बॉलिवूडच्या बिग डॅडींचे का ऐकू.'

ती पुढे म्हणाली, 'मी लहानपणापासूनच कुणाला घाबरत नाही. मी लहान वयातच घर सोडले. मात्र लोकांना वाटते की, करिअरमध्ये यशस्वी झाल्यानंतर मी अशी झाली आहे, तर तसे काही नाही. मी लहानपणापासून अशी आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप संघर्ष केला आहे. महिला सक्षमीकरणावर भाष्य करणाऱ्या सिनेमाला मी नेहमीच पहिली पसंती दिली आहे. तसेच मी नेहमी माझ्या मनाचे ऐकत आली आहे.'

एकता कपूरसोबत काम करणे आव्हानात्मक होते

कंगना पुढे म्हणाली, ''लॉकअपसाठी एकताने जेव्हा सहमती दर्शवली तेव्हा मला माहित होते की, आव्हाने येणारच. त्यामुळे जेव्हा मला या शोसाठी काम करण्याची संधी मिळाली तेव्हा मी अजिबात घाबरले नाही. अलीकडेच लॉक अप या रिअ‍ॅलिटी शोचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा शो तुम्ही MX Player आणि AltBalaji वर पाहू शकता.''

शिवाय, लॉकअप शो मधील 16 स्पर्धकांना कोणत्याही आलिशान सुविधांशिवाय कारागृहासारख्या वातावरणात बंद केले जाईल. यासह, स्पर्धकांना अशा सहकारी स्पर्धकांसह ठेवले जाईल ज्यांच्याशी त्यांचे कटु संबंध आहेत. या शो शिवाय कंगना तेजस आणि धाकड या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com