कंगना रणौतचा, 'अग्निपथ' योजनेला पाठिंबा, 'अग्निपथ म्हणजे...'

कंगना राणौत जितकी तिच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे तितकीच ती तिच्या वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते.
Kangana Ranaut
Kangana RanautDainik Gomantak
Published on
Updated on

कंगना राणौत (Kangana Ranaut) जितकी तिच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे तितकीच ती तिच्या वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. तिहेरी तलाकपासून ते जीएसटी आणि कृषी कायद्यापर्यंत कंगना नेहमीच सरकारच्या समर्थनार्थ उभी राहिली आहे असे म्हणायला हरकत नाही. (Agnipath Scheme)

Kangana Ranaut
किंग खान ने विकत घेतला महिला क्रिकेट संघ!

राजकारणा व्यतिरिक्त ती धार्मिक विषयांवरही खूपदा उघडपणे बोलताना दिसून आली आहे. आता पुन्हा एकदा कंगनाचे वक्तव्य समोर आले. सरकारने नुकतीच लागू केलेली 'अग्निपथ योजना' यावर कंगनाने भाष्य केले आहे. केंद्राच्या योजनेविरोधात सुरू असलेल्या गदारोळात कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे मत मांडले आहे.

तिने लिहिले आहे की, "इस्रायलसारख्या अनेक राष्ट्रांनी सर्व तरुणांसाठी सैन्य प्रशिक्षण अनिवार्य केले आहे, प्रत्येकाला शिस्त, राष्ट्रवाद यांसारखी जीवनमूल्ये शिकवली आहेत. #agnipathscheme चा सखोल अर्थ आहे फक्त सेना करियर बनवणे, रोजगार मिळवणे किंवा पैसे कमवणे नाही...”

इतकेच नाही तर कंगनाने या कार्यक्रमाची तुलना प्राचीन काळातील गुरुकुलाशी केली, ज्यात मुलांना गुरुकुलमध्ये पाठवण्याच्या पारंपरिक पद्धतीने तरुण सैनिकांची कंत्राटी पद्धतीने तात्पुरती भरती केली जाते.

Kangana Ranaut
'शमशेरा' चित्रपटाचे रणबीर कपूरचे पोस्टर लीक, पाहा अभिनेत्याचा दमदार लूक

अभिनेत्रीने पुढे लिहिले आहे की, "जुन्या दिवसांमध्ये प्रत्येकजण गुरुकुलमध्ये जात असे, त्यांना असे करण्यासाठी पैसे मिळत होते, ड्रग्ज आणि पबजीमध्ये नष्ट होत असलेल्या तरुणांची टक्केवारी धक्कादायक आहे यामध्ये सुधारणांची गरज आहे.

15 जून रोजी, केंद्रीय गृह मंत्रालयाने देखील जाहीर केले आहे की केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि आसाम रायफल्समध्ये भरतीमध्ये 'अग्निवर'ला प्राधान्य दिले जाईल.

अग्निपथ संरक्षण भरती योजनेच्या विरोधात शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही अनेक राज्यांमध्ये निदर्शने सुरू राहिली, ज्यामध्ये गाड्या जाळण्यात आल्या, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करण्यात आली आणि हजारो ट्रॅक आणि महामार्ग देखील रोखण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com