Watch Video:...अन् कंगना पोहचली नवीन संसद भवनात

Watch Video: मात्र सर्वांच्या भुवया तेव्हा उंचावल्या जेव्हा कंगना रनौतने नवीन संसद भवनात उपस्थिती लावली.
Kangana Ranaut
Kangana RanautDainik Gomantak

Watch Video: बॉलीवूडची क्वीन कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. जितकी ती आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे तितकीच ती आपल्या सडेतोड वक्तव्यासाठीदेखील प्रसिद्ध आहे.

जुन्या संसद भवनाला निरोप देऊन नवीन संसद भवनात प्रवेश करण्यात आला. यावेळी देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यावेळी उपस्थिती होती. मात्र सर्वांच्या भुवया तेव्हा उंचावल्या जेव्हा कंगना रनौतने नवीन संसद भवनात उपस्थिती लावत सगळ्यांचे लक्ष तिने वेधून घेतले आहे.

दुसरीकडे अभिनेत्री ईशा गुप्तानेदेखील नव्या संसद भवनात उपस्थिती लावत महिला आरक्षण बिलाला मंजूरी दिल्याबद्दल मोदींचे कौतुक केले आहे. त्यांची विचारसरणी प्रगतीशील असून यामुळे महिलांची प्रगती होण्यास मदत होईल असे त्यांनी म्हटले आहे. या बिलामुले महिलांना बरोबरीचा हक्क मिळेल असे तिने म्हटले आहे.

दरम्यान, दोन दिवसापूर्वी कंगणाने मोदींच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त त्यांची तुलना भगवान रामाबरोबर करत मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने ती चर्चेत आली होती.

करिअरबद्दल बोलायचे झाले तर कंगना रनौत सध्या तिच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्याचे ती दिग्दर्शन करत आहे. शिवाय, ती यात अभिनयही करत असून, इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. 24 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात महिमा चौधरी, अनुपम खेर, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे आणि दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्याही भूमिका आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com