Kala Paani Trailer: 'काला पानी' मधील थरकाप उडवणारी दृश्ये!

Kala Paani Trailer: या वेब सीरीजच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
Kala Paani
Kala PaaniDainik Gomantak
Published on
Updated on

Kala Paani Trailer: सध्या ओटीटीवर एकापेक्षा एक चित्रपट दाखल होत आहेत. नव्या धाटणीचे, कल्पनेला दिलेला वास्तविकतेचा स्पर्श , हरहुन्नरी कलाकार, तेवढ्याच उच्च दर्जाचे दिग्दर्शन अशा अनेक कारणांमुळे ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील सीरीजला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आता नेटफ्लिक्सवरील 'काला पानी' या नवीन वेब सीरीजची चर्चा रंगली आहे. काला पानीचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून ट्रेलर पाहिल्यानंतर या वेब सिरीजची चर्चा सुरू झाली आहे. ही वेबसीरीज पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

Kala Paani
Samantha-Naga Chaitanya: को- पॅरेंटिंगच्या निमित्ताने नागा चैतन्य अन् समंथा पुन्हा एकत्र?

अभिनेत्री मोना सिंह 'काला पानी' मध्ये मुख्य भूमिकेत आहे. ती नुकतीच 'मेड इन हेवन 2' मध्ये दिसली होती. त्या सीरीजमधील मोना सिंगचे काम खूप आवडले होते. आता पुन्हा एकदा ती 'काला पानी' मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

ही कथा अंदमान आणि निकोबार बेटांवर बेतलेली आहे, यामध्ये असे दाखवण्यात आले आहे की एका गूढ आजाराने संपूर्ण जागा व्यापली आहे. ट्रेलर( Trailer )मध्ये एका व्यक्तीच्या तोंडातून काळे रक्त येत आहे. हे दृश्य पाहून थरकाप होत असल्याचे अनेकांनी म्हटलंय.

या रहस्यमयी आजाराबद्दल अधिक माहीती मिळवण्यासाठी एक पत्रकार अंदमानला जातो आणि तिथे तो कसा फसतो यादरम्यान अनेक गोष्टी समोर येतात. प्रत्येकजण आपल्या आप्तांची काळजी घेण्यासाठी धडपड करत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, या वेब सीरीजच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता वेबसीरीज प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यामध्ये मोना सिंग आणि आशुतोष गोवारीकर हे प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com