Ranveer Singh: प्रदर्शनाआधीच रणवीर सिंहचा ‘जयेशभाई जोरदार’ वादात!

रणवीर सिंहचा आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार' (Jayeshbhai Jordaar) रिलीज होण्यापूर्वीच अडचणीत सापडला आहे.
Ranveer Singh|Jayeshbhai Jordaar Movie Controversy
Ranveer Singh|Jayeshbhai Jordaar Movie ControversyDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवुडमधील् प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार' (Jayeshbhai Jordaar) रिलीज होण्यापूर्वीच अडचणीत आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका सीनबाबत बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये ट्रेलरच्या एका सीनमध्ये प्रसूतीपूर्व लिंग निर्धारणासाठी अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानाचा वापर चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'युथ अगेन्स्ट क्राइम' नावाच्या एनजीओने ही याचिका दाखल केली आहे. (Jayeshbhai Jordaar Movie News )

चित्रपटासंबंधित हे प्रकरण कार्यवाहक मुख्य न्यायाधीश विपिन सांघी आणि न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठासमोर ठेवण्यात आले होते. अधिवक्ता पवन प्रकाश पाठक यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, हा चित्रपट स्त्री भ्रूणहत्या या विषयावर आधारित असून, 'मुलगी वाचवा' या मोहिमेवर भर दिला आहे. पण, चित्रपटाच्या (Movie) ट्रेलरमध्ये प्रसुतिपूर्व लिंग निदान स्क्रिनिंगचा एक सीन दाखवण्यात आला आहे.

Ranveer Singh|Jayeshbhai Jordaar Movie Controversy
विद्या बालनच्या 'मंजुलिकाची' जबाबदारी उचलताना...: कियारा अडवाणी

इतकंच नाही तर, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानाच्या वापराची जाहिरात करण्यात आली आहे, जी योग्य नाही. गर्भधारणा आणि प्रसवपूर्व निदान तंत्र कायदा, 1994 अंतर्गत हे बेकायदेशीर आहे. भारतातील स्त्री भ्रूणहत्या आणि घटते लिंग गुणोत्तर रोखण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार प्री-नॅटल लिंग स्क्रीनिंगला बंदी आहे. त्यामुळे चित्रपटामधून हा सीन काढला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या चित्रपटात रणवीर सिंह (Ranveer Singh) एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर जेव्हा या चित्रपटाच्या कथेची कल्पना सर्वांसमोर आली, तेव्हा लोकांनी त्याचे खूप कौतुक केले. रणवीर सिंहच्या व्यक्तिरेखेचे ​​लोकांकडून खूप कौतुक केले गेले. मनीष शर्मा निर्मित, 'जयेशभाई जोरदार' मध्ये 'अर्जुन रेड्डी' फेम शालिनी पांडे देखील आहे, जी या चित्रपटातून रणवीरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट 13 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com