Javed Akhtar: '...तुम्ही तालिबानशी सहमत आहात का'? अख्तरांचा मुस्लिम धर्मगुरुंना सवाल

Javed Akhtar: जावेद अख्तर अनेकदा आपल्या ट्विटमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि इस्लामिक धर्मगुरुंवर निशाणा साधला आहे.
Javed Akhtar
Javed AkhtarDainik Gomantak
Published on
Updated on

Javed Akhtar: जावेद अख्तर अनेकदा आपल्या ट्विटमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि इस्लामिक धर्मगुरुंवर निशाणा साधला आहे. मुस्लिम महिला आणि मुलींच्या शिक्षण आणि नोकऱ्यांवर तालिबानने बंदी घातली आहे, यावर जावेद यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतातील मुस्लिम गप्प का आहेत? तुम्ही तालिबानशी सहमत आहेत का? असे सवाल अख्तर यांनी उपस्थित केले आहेत.

जावेद अख्तर यांनी हे ट्विट केले आहे

जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी ट्विट करत म्हटले की, 'तालिबानने इस्लामच्या नावाखाली सर्व महिला आणि मुलींना शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि नोकऱ्यांवर बंदी घातली आहे. भारतीय मुस्लिम पर्सनल बोर्ड आणि इतर इस्लामिक गुरु याचा निषेध का करत नाहीत? ते तालिबानशी सहमत आहेत का?'

Javed Akhtar
Javed Akhtar: जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावरुन पुन्हा वादंग, 'महिलांनाही द्या एकापेक्षा...'

ट्विटवर प्रतिक्रिया

काही लोक जावेद अख्तर यांच्याशी सहमत आहेत तर काही लोक त्यांच्यावर टीका करत आहेत. एका ट्विटर यूजर्सने दिल्लीच्या इस्लामिक गुरुचे वक्तव्य पोस्ट केले आणि लिहिले की, जावेद अख्तर यांना खोटी टिप्पणी करु नये. तालिबानच्या या आदेशाला दिल्लीतील एका धर्मगुरुने विरोध केला होता. तर दुसऱ्याने लिहिले की, 'सर, भारताच्या (India) स्थितीवर तुम्ही बोलले पाहिजे. मुस्लिमांच्या नव्हे तर बहुसंख्यांच्या जुलुमावर काहीतरी बोला.'

Javed Akhtar
जावेद अख्तर बनले Fake news चे शिकार , लखनौ पोलिसांची बनावट प्रेस रिलीज केली शेअर

जगभर आंदोलने होत आहेत

अफगाणिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षण आणि नोकऱ्यांवर बंदी घालण्याच्या निर्णयाचा जगभरातून विरोध होत आहे. भारतातही परराष्ट्र मंत्रालयाने यावर भाष्य केले होते. MEA चे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते की, आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. अफगाणिस्तानातील महिलांच्या शिक्षणाला भारताने नेहमीच पाठिंबा दिला आहे. या बंदीनंतर अफगाणिस्तान हा जगातील एकमेव देश असेल जिथे मुली आणि महिलांना शिक्षण आणि नोकरीपासून वंचित ठेवले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com