प्रसिद्ध चित्रपट निर्माते जेम्स कॅमेरॉन यांचा अवतार: द वे ऑफ वॉटर (Avatar The Way Of Water) या चित्रपटाच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 2009 मध्ये रिलीज झालेल्या 'अवतार'चा सिक्वेल आहे, ज्याची क्रेझ अजूनही लोकांच्या डोक्यात आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. आता 'अवतार: द वे ऑफ वॉटर' रिलीज होण्यापूर्वी भारतात (India) त्याच्या तिकिटांची आगाऊ बुकिंग सुरू झाली आहे.
एका अहवालानुसार केवळ तीन दिवसांत 'अवतार: द वे ऑफ वॉटर'च्या 15 हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. ही आगाऊ बुकिंग केवळ 45 स्क्रीन्सवर प्रीमियम स्वरूपात होती. अॅडव्हान्स बुकिंगसाठी मिळत असलेला प्रतिसाद पाहता आणखी काही स्क्रीन वाढवण्यात येत आहेत.
हा चित्रपट अनेक भाषांमध्ये होणार रिलीज
'अवतार: द वे ऑफ वॉटर' हा चित्रपट 16 डिसेंबर 2022 रोजी इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये देशभरात रिलीज होणार आहे. काही काळापूर्वी, जेम्स कॅमेरूनने 'अवतार' चित्रपटगृहांमध्ये पुन्हा रिलीज करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून चाहत्यांना पुन्हा एकदा पॅंडोराच्या दुनियेची ओळख व्हावी. यावेळी चित्रपटात मानव आणि पांडोरा येथील रहिवासी यांच्यात पाण्याखालील लढाई होणार आहे, हे ट्रेलरमधून स्पष्ट झाले आहे.
जेम्स कॅमेरून हे महागडे चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. रिपोर्ट्सनुसार, 'अवतार: द वे ऑफ वॉटर' 250 दशलक्ष डॉलर्समध्ये तयार करण्यात आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.