Jacqueline Fernandez : जॅकलिन फर्नांडिस आणि सोनु सूद आगामी 'फतेह' मध्ये एकत्र येणार...

अभिनेता सोनू सूद आणि जॅकलिन फर्नांडिस त्यांच्या आगामी 'फतेह' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत ..
Sonu Sood
Sonu Sood Dainik Gomantak

चित्रपट आणि राजकारणात कुठल्या व्यक्तीचं वावडं कुणाला नसतं. कधी कुठल्या व्यक्तीसोबत काम करावं लागेल याबद्दल काही सांगणं मोठं मुश्कील असतं. कधीच एकत्र काम न केलेली अभिनेत्री किंवा अभिनेता एकत्र काम करु शकतात. बॉलिवूडची ब्युटी क्वीन जॅकलिन फर्नांडिस आणि सोनू सूदच्या बाबतीत हेच झालं आहे. सध्या या दोघांच्या पुढच्या चित्रपटात एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत.

जॅकलिन फर्नांडिस रोहित शेट्टीच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'सर्कस'मधल्या सुंदर रेट्रो लूकने घायाळ करुन गेली. 2023 ला सुद्धा जॅकलिन आपल्यात नव्या रुपात दिसु शकते ;कारण अभिनेता सोनू सूद त्याचा आगामी चित्रपट 'फतेह' जॅकलिनसोबत करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

'विक्रांत रोना' या चित्रपटात 'रा रा रक्कम्मा'या गाण्यात जॅकलिन फर्नांडिस चांगलाच भाव खाऊन गेली होती. प्रेक्षकांनी तर जॅकलिनला नावाजले होतच पण समीक्षकांनीही जॅकलिनचं कौतुक केलं होतं. सर्कस चित्रपटातला तिचा आगळावेगळा लुकही प्रेक्षकांनी स्वीकारला होता

Sonu Sood
Hera-Pheri 3 : हेरा-फेरी 3 मध्ये अक्षय कुमार असणार की कार्तीक आर्यन? दिग्दर्शक 'अनीस बाज्मी' शेवटी बोललेच..

जॅकलिन यानंतरही खुप व्यस्त असणार आहे कारण तीच्या 'क्रॅक'या चित्रपटाचीही नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. जॅकलिन 'टेल इट लाइक अ वुमन' या हॉलिवूडपटांतही दिसण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com