
Is RJ Mahavesh girlfriend of Chahal: भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाल्यापासून युझी शांत होता. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत त्याने घटस्फोटानंतरच्या मानसिक वेदना आणि जीवनात आलेल्या नैराश्याबद्दल मोकळेपणाने सांगितले. या काळात त्याला 'चीटर' म्हणून हिणवले गेल्याने प्रचंड मानसिक त्रास झाला, तसेच त्याच्या मनात आत्महत्येचे विचारही आल्याचे त्याने सांगितले.
राज शमानीला दिलेल्या एका मुलाखतीत युझवेंद्रने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तो म्हणाला, "घटस्फोटानंतर सुमारे ४० दिवस मी प्रचंड वेदनेत होतो. मी तासंतास रडत असे, दिवसातून फक्त दोन तास झोपायचो आणि मला सतत ॲन्झायटी अटॅक येत होते." या कठीण काळात त्याच्या मनात आत्महत्येचे विचारही आले होते, असे त्याने सांगितले. युझवेंद्र म्हणाला की, त्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय त्याच्या या अवस्थेबद्दल पूर्णपणे जाणून होते.
युझवेंद्र आणि धनश्री यांनी कोरोनाकाळात लग्न केले होते, जेव्हा धनश्री त्याची डान्स टीचर होती. युझीने सांगितले की त्यांच्या नात्यात दुरावा येण्याचे कारण म्हणजे दोघेही आपापल्या कामात खूप व्यग्र होते, ज्यामुळे नात्यात अपेक्षित तडजोड आणि वेळ देणे शक्य झाले नाही.
पुन्हा प्रेमात पडायला तयार आहेस का, असे विचारले असता युझवेंद्रने सांगितले की, त्याला अजून थोडा वेळ हवा आहे. तो म्हणाला, "घाबरलेलो नाही, पण पुन्हा काहीतरी गमावण्याची भीती वाटते. कारण मी कोणाच्याही प्रेमात मनापासून पडतो. मग जेव्हा तुम्ही इतके जोडलेले असता आणि अचानक गोष्टी संपतात, तेव्हा ती भीती मनात घर करून राहते. पुन्हा एकटेपणा येतो. मग तुम्ही घाबरता, जास्त विचार करता की, 'पुन्हा असेच झाले तर?'"
धनश्रीपासून वेगळे झाल्यानंतर युझवेंद्रचे नाव आरजे महावश सोबत जोडले गेले होते. यावर त्याने तीव्र नाराजी व्यक्त करत हे दावे फेटाळले. तो म्हणाला, "केवळ तुम्ही कोणासोबत दिसलात म्हणून लोक तुम्हाला लगेच एकमेकांशी जोडतात. मला दोन बहिणी आहेत आणि मी महिलांचा आदर कसा करायचा हे जाणतो. असे काहीही नाही. लोकांना जे वाटेल ते वाटू द्या." त्याने स्पष्ट केले की, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकत्र दिसणे किंवा ख्रिसमस डिनरला मित्रांसोबत असणे, अशा गोष्टींचा चुकीचा अर्थ लावला गेला. ख्रिसमसच्या डिनरला आम्ही पाच जण होतो, पण फोटो अशा प्रकारे क्रॉप केले गेले की आम्ही दोघेच एकत्र डिनर करत आहोत असे दिसले, असे युझी म्हणाला.
युझवेंद्र आणि धनश्री यांचा घटस्फोट २०२५ च्या सुरुवातीला झाला. या आधी ते अडीच वर्षे वेगळे राहत होते. बांद्रा फॅमिली कोर्टाच्या निर्देशानुसार, मुंबई उच्च न्यायालयाने सहा महिन्यांचा कूलिंग पीरियड माफ करून प्रक्रिया जलद केली आणि २० मार्च २०२५ रोजी त्यांच्या घटस्फोटाला अंतिम मान्यता दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.