Goodbye College म्हणत इरफान खान च्या मुलाने सोडलं शिक्षण...

दिवंगत अभिनेता इरफान खानचा (Irrfan Khan) मुलगा बबील (Babil Khan) याने आज सकाळी आपला अभ्यास सोडून देण्याची घोषणा करून सर्वांना चकित केले.
Irrfan Khan's son Babil Khan
Irrfan Khan's son Babil KhanInstagram/ Babil Khan
Published on
Updated on

दिवंगत अभिनेता इरफान खानचा (Irrfan Khan) मुलगा बबील (Babil Khan) याने आज सकाळी आपला अभ्यास सोडून देण्याची घोषणा करून सर्वांना चकित केले. आपल्या इंस्टाग्रामवर (Instagram) एका पोस्टमध्ये बबीलने अशी माहिती दिली आहे की, तो आता अभिनेता म्हणून करिअर करण्यावर आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी आपले शिक्षण सोडत आहे.बबील वेस्टमिन्स्टर विद्यापीठातून फिल्म स्टडीजमध्ये ‘बॅचलर ऑफ आर्ट्स’ घेत होता. दिग्दर्शक अंविता दत्तच्या आगामी ‘नेटफ्लिक्स’ चित्रपटाद्वारे तो अभिनेता म्हणून पदार्पण करणार आहे. त्याने इंस्टाग्रामवर आपल्या मित्रांसाठी आणि विद्यापीठासाठी एक भावनिक संदेश लिहून अभ्यास सोडल्याबद्दल माहिती दिली.(Irfan Khan son Babil left studies)

Irrfan Khan's son Babil Khan
'रेस 4' सिनेमात सलमान आणि सैफ एकत्र दिसणार का ?

बबिलने कॅप्शन मध्ये लिहीत म्हणाला, "माझ्या प्रिय मित्रांची मला खूप आठवण येईल. माझे मुंबईत फक्त एक-दोन मित्र आहेत. तुम्ही सर्वांनी मला दुसर्‍या देशात घरच्यांसारखं ठेवलं .. धन्यवाद. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो. आज मी ‘फिल्म बीए’ सोडला, कारण आता मला माझं पूर्ण लक्ष अभिनयावर केंद्रित करायचं आहे. वेस्टमिन्स्टर विद्यापीठ गुडबाय" .चित्रपट निर्माते शुजित सिरकार (Shoojit Sircar) आणि निर्माता रॉनी लाहिरी (Ronnie Lahiri यांनीही गेल्या आठवड्यात बबिलबरोबर चित्रपटाची घोषणा केली होती. ज्याचा तपशील अद्याप देण्यात आलेला नाही.इरफान खान यांचे 29 एप्रिल 2020 रोजी मुंबईतील कोकिलबेन रुग्णालयात निधन झाले. त्याच्या कारकीर्दीच्या सर्वात उत्तम वेळी मृत्यूच्या क्रूर हातांनी इरफानला पकडले. 'हिंदी मीडियम' या चित्रपटासाठी ज्या वर्षी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला त्याच वर्षी इरफानला ब्रेन कॅन्सर झाल्याची बातमी मिळाली.

त्यांच्या उपचारासाठी ते सुमारे दीड वर्ष लंडनमध्ये राहिले. तो बरा होत होता. त्यानंतर तो लवकरच चित्रपटांमध्ये पुनरागमन करेल असे वाटत होते. काळाला काहीउ काही तरी वेगळेच मंजूर होते .आजारपणात त्याने आंग्रेज़ी मीडियम चित्रपटाचे चित्रीकरणही केले पण तो तितका फिट दिसत नव्हता. राजस्थानमधील टोंक या छोट्या गावातून बाहेर पडताना इरफान खानने बॉलिवूडमध्ये अभिनयाचे पहिले स्थान गाठले. यासाठी त्याने वीस वर्षांपेक्षा जास्त काळ परिश्रम घेतले. जेव्हा निकाल येऊ लागला तेव्हा इरफानने जगाला निरोप दिला.त्याच्या मृत्यूनंतर इरफानचे कुटुंब पूर्णपणे तुटले. या धक्क्यातून बबीलला बाहेर पडण्यास बराच काळ लागला. तो अजूनही आपल्या वडिलांची जुने फोटोस पोस्ट करून त्याला मिस करत असतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com