HBD Shraddha Kapoor: वयाच्या 16 व्या वर्षी श्रद्धाला सलमानकडून मिळाली होती चित्रपटाची ऑफर

Shraddha Kapoor Birthday: 3 मार्च 1987 साली जन्मलेली श्रद्धा आज 34 वर्षाची झाली आहे.
Shraddha Kapoor
Shraddha Kapoor Instagram /@Shraddha
Published on
Updated on

Interesting Facts about Shraddha Kapoor

बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस आहे. प्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापूरे यांची मुलगी असलेल्या श्रद्धाने आपल्या अभिनयातून चित्रपटसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ३ मार्च १९८७ साली जन्मलेली श्रद्धा आज 3४ वर्षाची झाली आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

२०१० साली तीन पत्ती ह्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणाऱ्या श्रद्धाचा २०१३ सालचा आशिकी २ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते.

वयाच्या १६ व्या वर्षी सलमान खानने दिली होती ऑफर

असे म्हटले जाते की, जेव्हा श्रद्धा १६ वर्षाची होती तेव्हा सलमान खान( Salman Khan )ने तिला चित्रपट ऑफर केला होता. बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये एका नाटकात अभिनय करताना त्याने श्रद्धाला पाहिले होते. त्यावेळी सलमानने चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती.श्रद्धा प्राण्यांच्या हक्कांविषयी सातत्याने सोशल मिडियावर व्यक्त होत असते. सोशल मिडिया( Social Media) च्या माध्यमातून ती जागरुकता पसरवत असते.

दरम्यान, श्रद्धा सोशल मिडियावर दर रविवारी काही पोस्ट शेअर करत मजेशीर अंदाजात कॅप्शन लिहत असते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या राहुल मोदी यांच्याशी असलेल्या नात्यामुळे मोठ्या चर्चेत आहे. ते दोघे डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र दोघांनीही याबद्दल खुलासा केला नाही. नुकतेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडींग कार्यक्रमाला त्यांनी एकत्र हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर 'स्त्री २' या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com