सैनिकांच्या कुटुंबीयांवर आधारित ‘भारत माझा देश आहे’ चा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयींच्या हस्ते प्रदर्शित
India is my country
India is my countryDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई : दिग्दर्शक पांडुरंग कृष्णा जाधव यांनी ‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटातून भारतीयांच्या मनात जवानांसाठी असलेला आपलेपणा आणि त्यांच्या बद्दल असणाऱ्या भावना यांचा सुरेख मिलाफ यात उतरण्याचा प्रयत्न केला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. सैनिकांच्या भावना काय असतात कुटुंबीयांची घालमेल काय आहे हे दाखवणारा हा चित्रपट आहे. (India is my country 'trailer released )

India is my country
जस्मिन भसीन करतेय गुपचूप लग्न ? चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण

जेंव्हा सीमेवर सैनिक लढत असतात, तेंव्हा सैनिकाच्या घरात त्याच्या नातेवाईकांची घालमेल आणि कुटुंबियांवर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट आहे. जेव्हा टीव्हीवर युद्धाची ब्रेकिंग न्यूज येते तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांच्या मनाची घालमेल, आपला माणूस तिथे सुखरूप आहे का, ही सतत सतवणारी चिंता यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. हा विषय जरी अतिशय संवेदनशील असला तरी खूप हलक्याफुलक्या पद्धतीने तो चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

India is my country
जस्मिन भसीन करतेय गुपचूप लग्न ? चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण

ट्रेलरमध्ये आपला मुलगा परत यावा याकरता सोनूचा खास मित्र असलेल्या नाऱ्याचा बळी देण्याचा नवस सोनूची आजी बोलते. आता नाऱ्याचा बळी जाणार का आणि सोनूचे बाबा परत येणार का, हे चित्रपट पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे. येत्या ६ मे रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील ‘भारत माता की जय’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले. राजवीरसिंहराजे गायकवाड आणि देवांशी सावंत यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांची कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com