94th Academy Awards: 94वा अकॅडमी अवॉर्ड्स सुरु झाले आहेत, ज्यासाठी फक्त सेलिब्रिटीच नाही तर सामान्य लोक देखील खूप उत्सुक आहेत. विजेत्यांच्या निवड प्रक्रियेत, 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या 9847 सदस्यांनी 276 चित्रपटांसाठी मतदान केले. यंदाच्या ऑस्करमध्ये द पॉवर ऑफ द डॉगचे वर्चस्व आहे, ज्याला 12 नामांकने मिळाली आहेत. या चित्रपटात बेनेडिक्ट कंबरबॅच आणि कर्स्टन डन्स्ट मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर भारतातील एका डॉक्युमेंटरीचे नावही ऑस्करच्या नामांकनात समाविष्ट आहे. भारताने नामांकित केलेला हा माहितीपट म्हणजे 'रायटिंग विथ फायर' (Writing with Fire Documentary News).
या माहितीपटाकडून देशाला मोठ्या आशा आहेत. रायटिंग विथ फायर हा पत्रकारितेवर आधारित माहितीपट आहे, ज्याला ऑस्कर 2022 साठी नामांकन मिळाले आहे. या माहितीपटाला यापूर्वी सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या माहितीपटाने आतापर्यंत 12 आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.
रायटिंग विथ फायरचे दिग्दर्शन रिंटू थॉमस आणि सुष्मित घोष यांनी केले आहे. दोघांच्याही कारकिर्दीतील हा पहिलाच माहितीपट आहे. विशेष म्हणजे याला जागतिक स्तरावर चांगलीच पसंती मिळत आहे. पत्रकारांसमोरील आव्हाने आणि संघर्षांची कहाणी रायटिंग विथ फायरमध्ये दाखवण्यात आली आहे. आता या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाल्याने संपूर्ण देशाला या चित्रपटाकडून अपेक्षा आहेत.
लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये 94 व्या अकादमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. स्टार वर्ल्ड आणि स्टार मूव्हीजच्या माध्यमातून भारतीय प्रेक्षकांना ऑस्कर पाहता येणार आहे. यावेळी कॉमेडियन एमी शुमर, वांडा सायक्स आणि रेजिना हॉल होस्ट करत आहेत. गायक बियॉन्से आणि बिली इलिश ऑस्करमध्ये त्यांच्या गाण्यांनी रोमॅंन्टिक वातावरण तयार होणार आहे. पिचफोर्कच्या मते, 40 वर्षीय गायिका अकादमी अवॉर्ड्समध्ये तिचे बी अलाइव्ह गाणे गाताना दिसणार आहे. त्याचबरोबर बिली आयलीश नो टाईम टू डायच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.