IND VS PAK| Bollywood
IND VS PAK| BollywoodDainik Gomantak

Bollywood Celebs: कार्तिक आर्यनपासून ते अभिषेक बच्चनपर्यंत, बॉलिवूड सेलिब्रिटींनी भारताचा विजय असा केला साजरा

IND VS PAK: टीम इंडियाने पाकिस्तानला पाच विकेट्सने पराभूत केल्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला आहे.
Published on

आशिया चषकाच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. भारताने (India) सामना जिंकल्यानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. दुबईत झालेल्या या सामन्याचा हिरो होता हार्दिक पांड्या. भारत-पाकिस्तान यांच्यातील हा सामना पाहण्यासाठी सर्वजण आपापली कामे सोडून गेले होते आणि भारत जिंकताच जल्लोष सुरू झाला. या सेलिब्रेशनमध्ये बॉलीवूड स्टार्स कसे मागे राहतील? अभिषेक बच्चनपासून आयुष्मान खुरानापर्यंत प्रत्येकाने हा विजय वेगळ्या पद्धतीने साजरा केला आणि आपला आनंद सोशल मीडियावर शेअर केला.

हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांचे कौतुक करताना अर्जुन रामपालने लिहिले – येसस इंडिया… काय खेळ आहे. हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांचे आभार. इंडिया रॉक्स.

IND VS PAK| Bollywood
Allu Arjun Pushpa: अल्लु अर्जुनचा भाव वाढला! पुष्पा-2 घेणार एवढे मानधन

अभिषेक बच्चनने ट्विट करत
भारत-पाकिस्तान सामना आणि अभिषेक बच्चन कसे दूर राहू शकतात. भारताच्या विजयावर त्यांनी ट्विट केले- येसस...कॉमन. एकत्र ब्लू हार्ट इमोजी शेअर केले.

कार्तिक आर्यनने एक व्हिडिओ शेअर केला
कार्तिक आर्यनने हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो चौकार आणि षटकार मारताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले - मी दिवसभर भारत जिंकण्यासाठी प्रार्थना करत राहिलो.

आयुष्मान खुराना ने सेलिब्रेट केला
आयुष्मान खुराना आजकाल मथुरामध्ये त्याचा आगामी चित्रपट ड्रीम गर्ल 2 चे शूटिंग करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आयुष्मानने ड्रीम गर्ल 2 च्या टीमसोबत हा विजय साजरा केला. व्हिडिओमध्ये आयुष्मान खुराना फलंदाजी करताना दिसत आहे. ताज्या ट्रेंडला अनुसरून त्याने संपूर्ण टीमसोबत काला चष्मा गाण्यावर डान्स केला. व्हिडिओ शेअर करताना आयुष्मानने लिहिले- 'जीत गया इंडिया.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com