Prithviraj Movie: करोडोंचा खेळ, संजु बाबा पेक्षा खिलाडीला 12 पट जास्त फी

'पृथ्वीराज' या पीरियड ड्रामा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
Prithviraj Movie
Prithviraj MovieDainik Gomantak
Published on
Updated on

'पृथ्वीराज' या पीरियड ड्रामा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. पृथ्वीराज चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट राजा पृथ्वीराज चौहान यांचे शौर्य आणि धैर्य दाखवेल आणि त्याची रिलींग डेट 3 जून आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर त्याच्यासोबत अभिनेत्री मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) मुख्य भुमिकेत दिसणार आहे. दरम्यान, 'पृथ्वीराज' चित्रपटासाठी अभिनेत्याला किती फी ऑफर करण्यात आली आहे ते आपण खाली पाहु. (In Prithviraj movie Akshay Kumar has got more payment than Sanjay Dutt)

Prithviraj Movie
'विक्रम' मधील Pathala Pathala; कमल हसन पुन्हा फायर मोडमध्ये

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात किंग पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत दिसणार्‍या अक्षय कुमारला (Akshay Kumar) या भूमिकेसाठी 60 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या संजय दत्तपेक्षा (Sanjay Dutt) 12 पट जास्त असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात संजय दत्त वीर योद्धा 'काका कान्हा'च्या भूमिकेत दिसून येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या भूमिकेसाठी संजय दत्तला 5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली.

'पृथ्वीराज' या चित्रपटात सोनू सूदही (Sonu Sood) मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. अभिनेत्याला त्याच्या भूमिकेसाठी 3 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. मिस वर्ल्ड 2017 विजेती मानुषी छिल्लर 'पृथ्वीराज' चित्रपटात संयोगिताच्या भूमिकेत दिसून येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मानुषीला तिच्या डेब्यू चित्रपटासाठी 1 कोटी रुपयांची ऑफर देखील देण्यात आली आहे. मानव विज या चित्रपटात मोहम्मद गौरीच्या म्हणजेच खलनायकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. बातमीनुसार, मानवला या भूमिकेसाठी 10 लाख रुपयांची ऑफर देखील देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com