इफ्फीत (52IFFI) या वर्षी इराणी सिनेमा दिग्दर्शिका रख्शान बॅनिएतेमद ह्या ज्युरी मंडळाच्या अध्यक्षा असणार आहेत. एक पटकथाकार, निर्मात्या आणि दिग्दर्शिका म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची ख्याती आहे. जगभरच्या समिक्षकांनी आणि चित्रपट रसीकांनी त्यांचे चित्रपट वाखाणलेले आहेत. ‘फर्स्ट लेडी ऑफ इराणी सिनेमा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रख्शान राजकारण आणि घर यामधला सामाजिक आयाम आपल्या चित्रपटांमधून सखोलतेने मांडतात.
तेहरानमधील ‘ड्रॅमॅटिक आर्ट विद्यापीठा’तून पदवी मिळवल्यानंतर रख्शाननी आपल्या कार्यक्षेत्राची सुरुवात इराणी टेलीव्हिजन नेटवर्कमधून डॉक्युमेंटरी दिग्दर्शिका म्हणून केली. तिच्या सुरुवातीच्या चित्रपटांमुळे तिला प्रखर टीका झेलावी लागली असली तरी 1991 सालच्या ‘नर्गेस’या तिच्या सिनेमाने तिला प्रेक्षकांचा आणि टिकाकारांचा आदर मिळवून दिला. ‘फज्र चित्रपट महोत्सवा’त उत्कृष्ट दिग्दर्शिकेचा पुरस्कार पहिल्यांदाच एका महिलेला मिळून तिच्या या सिनेमाने इतिहास घडवला. त्यानंतर तिच्या चित्रपटांना पुरस्कार लाभतच गेले.‘द ब्लू वेईल्ड’ या चित्रपटासाठी तिला 1995 च्या ‘लोकर्नो चित्रपट महोत्सवा’त लिओपार्ड कांस्यपदक प्राप्त झाले.
चित्रपटांप्रमाणेच तिच्या माहितीपटांनादेखील जगभर वाखाणले गेले. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचे माहितीपट लोकप्रिय आणि यशस्वी आहेत. तिचा ‘अवर टाईम्स’ हा 2002 साली इराणच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला माहितीपट होता. हा माहितीपट अनेक चित्रपट महोत्सवातून गाजला. ‘आयडीएफए’या प्रख्यात दूरदर्शन वाहिनीवरूनही तो प्रदर्शित झाला.
2014 साली तिने दिग्दर्शित केलेला ‘टेलस्’ ह्या चित्रपटातून तिने वेगवेगळ्या सात लोकांच्या सात कहाण्या सादर केल्या. 71 व्या व्हेनिस चित्रपट महोत्सवात ‘गोल्डन लायन’ पुरस्काराच्या स्पर्धेत असणाऱ्या या चित्रपटाला उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला होता. 2014 सालच्या ‘टोरेंटो आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवात ‘टेलस्’ला ‘कंटेम्पररी वर्ल्ड सिनेमा’ विभागात स्थान मिळाले.
एक यशस्वी चित्रपट दिग्दर्शिका म्हणून रख्शान आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्द आहेत त्याशिवाय जगभरच्या अनेक चित्रपट महोत्सवात तिने ज्युरी सदस्या आणि ज्युरी अध्यक्षा म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.