Ileana D'cruz Baby: चिमुकल्याचा फोटो शेअर करत इलियानाने दिली गुड न्यूज

Ileana Dcruz Baby: इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेल याला डेट करत असल्याची अनेकदा चर्चा झाली होती.
Eliana De Cruze pregnancy
Eliana De Cruze pregnancyDainik Gomantak
Published on
Updated on

Ileana Dcruz Baby: अभिनेत्री इलियाना डिक्रूझ गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे मोठ्या चर्चेत आहे. 18 एप्रिल 2023 ला जेव्हा तिने सोशल मिडियावर आपल्या प्रेग्नंसीबद्दल सांगितले होते तेव्हा चर्चांना उधान आले होते. या बाळाचे वडील कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

आता इलियानाने एक गुड न्यूज दिली आहे. सोशल मिडिायावर तिने चिमुकल्याला जन्म दिल्याची पोस्ट शेअर केली आहे. '1 ऑगस्टला बाळ जन्मले असून कोआ फिनिक्स डोलन असे त्याचे नाव ठेवल्याचे तिने म्हटले आहे. हा आनंद आम्ही शब्दात व्यक्त करु शकत नाही. तिच्या या पोस्टवर कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अथिया शेट्टी, डब्बू रतनानी, करणवीर शर्मा, हुमा कुरेशी, नर्गिस फाखरी, सोफी चौधरी, आस्था शर्मा यांनी इलियाना आणि बाळावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.'

दरम्यान, इलियानाचा मिस्ट्री मॅन अजूनही समोर आला नाही. नेटकऱ्यांसमोर आजही हाच प्रश्न आहे की, या बाळाचे वडील कोण आहेत. आता मात्र तिच्या बाळासाठी आशिर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. काहीवेळातच इलियाना डिक्रूझची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली. तिच्या चाहत्यांबरोबरच अनेक कलाकारांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Eliana De Cruze pregnancy
Prince Harry - Meghan : इतका दुरावा? प्रिन्स हॅरी आणि मेघनला क्वीन एलिझाबेथच्या डेथ ॲनिव्हर्सरीलाही नाही बोलावलं...

सुरुवातीपासूनच इलियाना तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अत्यंत कमी बोलली आहे. इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेल याला डेट करत असल्याची अनेकदा चर्चा झाली होती.

मालदीवमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफसोबत सुट्टी घालवताना दिसल्यानंतर दोघांच्या नात्याच्या अफवा पसरल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com