IFFI2021 : गोव्यात सध्या इफ्फी चालू आहे. मॅक्विनेझ पॅलेस 1702 मध्ये बांधला गेला. मूलत: तो दोन भावांचा होता-. डायगो दा कोस्टा डी एटाईड ई टायवे आणि क्रिस्टोवाम दा कॉस्ट डी एटाईड ई टायवे, ज्यांना मॅक्विनेझ नावाने ओळखले जात असे. 1842 मध्ये, पोर्तुगीजांनी सुमारे 150 वर्षे जुन्या या पॅलेसचा उपयोग वैद्यकीय संस्था, गोवा मेडिकल कॉलेज करण्यासाठी केला.
आता मॅक्विनेझ पॅलेसचे नूतनीकरण करण्यात आले आहे आणि त्यात गोव्याच्या ‘मनोरंजन सोसायटी’चे कार्यालय आहे, जे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सहयोगी आहेत.
‘इस्कोला मेडिको सर्जिका दा गोवा’ पोर्तुगीज राजवटीत 1842 मध्ये स्थापन करण्यात आले (गोव्याच्या मुक्तीनंतर 1963 मध्ये त्याचे ‘गोवा वैद्यकीय महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात आले) हे आशियातील सर्वात जुन्या वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक आहे. सोळाव्या शतकाच्या शेवटच्या दशकांत गोव्याला "पोर्तुगीजांची स्मशानभूमी" असे व्हाईसरॉय फ्रान्सिस्को डी टाव्होरा अल्व्होरने संबोधले. गोव्याची लोकसंख्या लक्षात घेता जुन्या गोव्यात स्वास्थ्याचा अभाव त्याला आढळून आला, ज्यात स्वच्छता आणि वैद्यकीय सेवेची कमतरता होती. त्याकाळात गोव्यात डॉक्टर दुर्मिळ होते.
गोव्यात वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम 1691 मध्ये सुरू झाला. ‘मुख्य फिजिसिस्ट’ (सार्वजनिक आरोग्य प्रमुख म्हणून नियुक्त केलेल्या डॉक्टरांना दिलेले नाव) मॅनोएल रोइझ डी सौसा यांनी ‘वैद्यकीय वर्ग’ सुरू केला. ते नोव्हा गोवाचे उप-राजे रॉड्रिगो दा कोस्टा यांनी केलेल्या विनंतीवरून गोव्यात आले होते. अठराव्या शतकात कार्यरत राहिले. 1801 मध्ये, पोर्तुगीजानी, कोइंब्रा येथून पदवी प्राप्त केलेले मुख्य फिजिसिस्ट अँटोनियो जोस डी मिरांडा ई आल्मेदा यांच्या निगराणीखाली ‘औषध आणि शस्त्रक्रिया वर्ग’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर गोवा सोडेपर्यंत हा कोर्स 1815 पर्यंत कार्यरत होता. नंतर 5 नोव्हेंबर 1842 रोजी "मेडिकल-सर्जिकल स्कूल ऑफ गोवा"ची सुरुवात झाली. नंतरच्या त्या कालावधीत या स्कूलने सुमारे 1,327 डॉक्टर आणि 469 फार्मासिस्ट तयार केले.
1961 मध्ये गोव्याचे भारतात विलीनीकरण झाले तेव्हा हे स्कूल मुंबई विद्यापीठाने आपल्या अधिकाराखाली घेतले. "मेडिकल-सर्जिकल स्कूल" आता "मेडिकल कॉलेज" झाले. 1986 मध्ये, ते गोवा विद्यापीठ (GU) च्या प्रशासनाखाली आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.