इफ्फी (IffI) संपली. ‘गोवा मनोरंजन सोसायटी’चे (ईएसजी) (ESG) एक वार्षिक कर्तव्य संपले. आता त्यातील मंडळी पुढील चार-पाच महिने इफ्फीच्या (IFFI) खर्चाचा ताळेबंद सोडवण्यात अगदी मनपूर्वक मग्न राहतील. हे चार-पाच महिने संपेपर्यंत पुढच्या इफ्फीची (IFFI) तयारी सुरू करायची वेळ येईल. ईएसजीचे (ESG) कर्मचारी वर्षपद्धतीप्रमाणे ‘इफ्फी’ (IFFI) नामक ग्रहाभोवती पुन्हा पुन्हा एकदा फेर धरतील.
एकदा ईएसजीची जनरल मॅनेजर (Manager) कुणाशी तरी बोलताना ऐकु आले होते, ‘आय एम एंजोईंग थिस जॉब!’ किती छान! खरंच आहे ते. आरामात ऑफिसला (Office) यायचे आणि वेळ संपला की घरी जायचे. इफ्फीच्या (IFFI) काळात तेवढा थोडाफार डोक्याला ताप असतो. तेवढा ताप सोडला तर वर्षभर ही माणसे, एक-दोन नव्हे, तब्बल चाळीसच्या संख्येत, करतात तरी काय? हा प्रचंड प्रश्न सामान्य माणसाला पडलेला असतो. पण त्या सामान्य माणसाला काय कल्पना की एक इफ्फीचा (IFFI) खर्च कसा वेगवेगळ्या ठिकाणी ‘गुस्पलेला’ असतो आणि त्याच्या गाठी सोडेपर्यंत कशी दमछाक होते ती? ईएसजीचे (ESG) उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांच्या म्हणण्याप्रमाणे तर गेल्या चार-पाच वर्षांच्या हिशेबांच्या सुरगाठी अलिकडेच कधीतरी सुटून मोकळ्या झालेल्या आहेत. म्हणजे बघा, कुठल्या आणि कसल्या गाठीत गुरफटून राहिलेली असतात ही सारी मंडळी?
अशा या ‘मूर्ती छोटी पण कीर्ती महान’ असलेल्या ईएसजीचा (ESG) कारभार हाकायला एक उपाध्यक्ष (बहुधा राजकारणी) एक सीईओ (CEO) (बहुधा आयएएस ऑफिसर) आणि एक व्यवस्थापक असे एक शिखरमंडळ आहे. चाळीसएक कर्मचारी आणि त्याशिवाय दिमतीला भले मोठे सल्लगार मंडळ आहे. पण या सल्लागार मंडळामधल्या प्रॅक्टिकल (Practical) सल्ला देणाऱ्या बहुतेक सल्लागारांना दूर ठेवून वरील ‘शिखर’स्थ मंडळींच ईएसजीचा (ESG) कारभार आपसातल्या छान संगनमताने मार्गाला लावतात. गेल्यावर्षी तर कौन्सिल मीटिंग फक्त दोनदा झाली. ईएसजीच्या मिटिंगचा (Meeting) अजेंडादेखील या सल्लागार मंडळाला मीटिंगच्या आधी कधीच मिळत नाही. नव्हे, हा अजेंडा मीटिंगआधी न पाठवण्यातच तिच्या व्यवस्थापिकेचे आणि प्रशासकांचे कौशल्य लपलेले आहे. ‘किद्याक जाय त्यो मिटिंगो-बिटिंगो? तातुन सगळो बोवाळच चड जाता.’
हे सध्या ईएसजीचा (ESG) कारभार सांभाळणाऱ्या व्यवस्थापिकेचे अगदी प्रसिद्ध वाक्य आहे. सल्लागार मंडळाच्या काही सदस्यांनी तर गेल्या दोन वर्षात ईएसजीच्या पदाधिकाऱ्यांचे तोंड प्रथमच पाहिले होते. जनरल कौन्सिलची सभा (General Council Meeting) दोन वर्षात पहिल्यांदाच होत होती. जेव्हा भर मिटींगमध्येच या सदस्यांसमोर स्टेपल केलेल्या अजेंड्याची जाडजूड पुस्तिका अचानक आली तेव्हा, त्यांच्या चेहऱ्यावरचे सबगोलंकार हावभाव पाहून ईएसजीच्या प्रशासनातील मंडळींनी गालातल्या गालात भरपूर हसूनही घेतले असावे. तर अशातऱ्हेने अगदी बुद्धिबळाच्या मांडलेल्या पटाप्रमाणे ईएसजीचा (ESG) कारभार या मंडळींनी मस्त चतुरपणे मांडलेला आहे. ‘पट भी मेरा, जीत भी मेरी’ अशी छान त्याची रचना करून. वर्षातून एक ‘इफ्फी’ (IFFI) आयोजित करणे इतकेच ईएसजीचे काम आहे काय? राज्यातील सिनेमा (Movie) करणारी मंडळी या संस्थेकडे आशेने का पाहत असतात आणि ‘अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी?’ म्हणत आपली फरफट का सहन करतात याची थोडीशी माहिती आपण उद्या करून घेऊ.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.