यावर्षी इफ्फीचा पडदा ‘द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड’ या सिनेमाने उघडणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक (Director) आहेत, कार्लोस सुआरा. गेल्या इफ्फीत जीवनगौरव पुरस्कार लाभलेले नामवंत सिनेमॅटोग्राफर (Cinematographer) , विटारियो स्टोरारो हे ‘द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड’चे छायाचित्रकार (Photographer) आहेत. हा चित्रपट म्हणजे सिनेमा क्षेत्रातल्या दोन मास्टर्सनी सादर केलेला नजराणा असेल.
हा सिनेमा दोन नर्तकांच्या प्रेमाची कहाणी सांगतो, जे एका सांगीतिकेमध्ये मुख्य भूमिकेत एकमेकांसमोर येतात. मेक्सिकोचे लोकसंगीत आणि लोकनृत्य या सांगीतिकेचे माध्यम बनून मेक्सिको आणि स्पेन या दोन देशांमधल्या पूर्व संबंधांची कहाणी, वेगळ्या संदर्भाने ही संगीतिकेतून सादर व्हायची असते. मान्युअल या सांगीतिकेच्या निर्मितीत आपली पूर्वाश्रमीच्या पत्नीची, साराची मदत घेतो, जी एक नामवंत कोरिओग्राफर असते. उगवत्या तारिकेचा अंतर्भाव सांगीतिकेच्या टीममध्ये होतो. तालमींच्या वेळेस त्यानंतर निर्माण होणार असतो तीव्र तणाव. सांगीतिकेचे प्रभावी मेक्सिकन संगीत, वास्तवता, कल्पनारम्यता आणि शोकांतिका अशी वीण विणत या खेळाला एक उंचीवर घेऊन जाते.
कार्लोस सुआरा हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट दिग्दर्शक आहेत. ज्यांना ऑस्कर पुरस्कारासाठी चारवेळा नॉमिनेशन लाभले आहे. त्यांना बाफ्ता, बर्लिन चित्रपट महोत्सव, कान चित्रपट महोत्सव, युरोपियन चित्रपट महोत्सव, व्हेनिस चित्रपट महोत्सव, गोल्डन ग्लोब इत्यादींचे पुरस्कार आतापर्यंत लाभलेले आहेत.
गेल्या इफ्फीत जीवनगौरव पुरस्कार मिळालेले विटोरी स्टोरारो यांना त्यांच्या ‘ॲपोकेलीप्स’ या चित्रपटासाठी1980 साली, ‘रेडस’ या चित्रपटासाठी 1982 साली आणि ‘लास्ट एम्परर’ या सिनेमासाठी1988 साली ऑस्कर पुरस्कार लाभले आहेत. 1991 सालच्या ‘डिकी ट्रॅसी’ या सिनेमासाठी ही त्यांना आॅस्करचे नॉमिनेशन लाभले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.