Shakira
ShakiraDainik Gomantak

Shakira: जेरार्ड पिकबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर शकीराला येतायत त्रासदायक लेटर्स

Shakira Latest News: शकीरा नेहमीच तिच्या गाण्यांमुळे सोशल मिडीयावर चर्चेत असते.
Published on

हॉलिवूड गायिका शकीराची गाणी हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत प्रसिध्द आहेत. तिच्या गाण्याचे चाहते जगभरात आहेत. ती नेहमीच तिच्या गाण्यांमुळे सोशल मिडीयावर चर्चेत असते. पण, नुकतीच एक बातमी समोर आली आहे. ज्यामुळे शकीरासह तिचे चाहतेही चिंतेत पडले आहेत. ही बातमी शकीराच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आहे. सॉकरपटू जेरार्ड पिकसोबत (Gerard Pique) ब्रेकअप झाल्यानंतर कोणीतरी शकीराला वाईटरित्या स्टॉक करत आहे. एवढेच नाही तर तिला त्रासदायक लेटर्स येत आहेत. मात्र, शकीराने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिच्या घराबाहेर आणि आजूबाजूला अनेक लोकांचा पहारा आहे. बार्सिलोनामध्ये शकीराला तिच्या घरी त्रासदायक लेटर्स येत असल्याचेही वृत्तात म्हटले आहे. या लेटर्समध्ये काय आहे हे वाचुन तुम्हालाही आश्चर्य वाटेल. "वाका वाका" गायिका शकीरा हिला जी त्रासदायक लेटर्स येत आहेत, त्यात चाहते तिच्याशी लग्न करण्याची विनंती करत आहेत. आता हे प्रकरण वाढत असल्याचे पाहून शकीराचे कुटुंबीय आणि तिचा भाऊ टोनिनो मेबारक यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

Shakira
Priyanka Chopra Vacation: प्रियांका चोप्रा शेअर केले जोनाससह बीच व्हॅकेशनचे क्युट फोटो

एक्स बॉयफ्रेडवर शंका

शकीराने या पत्रांचा संशय फक्त तिचा एक्स बॉयफ्रेड फुटबॉल स्टार जेरार्ड पिकवर व्यक्त केला आहे. तिला संशय आहे की जेरार्ड पिक तिचा छळ करण्यासाठी तिचा पाठलाग करत आहे. शकीरा आणि जेरार्डचे 12 वर्षांच्या दीर्घ नात्यानंतर ब्रेकअप झाले होते.

* पत्रात काय लिहिले होते?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला शकीराला एका स्टॉकरकडून एक पत्र प्राप्त झाले. ज्यामध्ये असे लिहिले होते की तो तिच्यावर प्रेम करतो आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे आहे. जे वाचल्यानंतर शकीराने यामागे जेरार्डचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तपासानंतर शकीराचा छळ करणारा गुन्हेगार रशियन असल्याचे समजते. याशिवाय, अशीही माहिती आहे की, रशियन जेरार्ड पिकसोबत विभक्त झाल्याची घोषणा झाल्यापासून तो शकीराच्या घराभोवती शकीराचा पाठलाग करत होता.

ब्राझिलियन मॉडेलने जेरार्डवर गंभीर आरोप केले

ब्राझीलची मॉडेल कॉर्टेजने जेरार्डवर आरोपही केला आहे. शकीरापासून वेगळे झाल्यानंतर जेरार्डने तिला अश्लील मेसेज पाठवून त्रास दित आहे. याशिवाय मॉडेलने जेरार्डबद्दल अनेक खुलासे केले आहेत. पहिल्या भेटीनंतर, जेरार्डने तिला इंस्टाग्रामवर मॅसेज पाठवण्यास सुरुवात केली, जी तिने डिलीट केले. मॅसेजमध्ये जेरार्डने अनेकदा लिहिले की, "मी युरोपला कधी परत येईन आणि माझे बुब्स किती मोठे आहेत."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com