Chhello Show Oscars Entry: 'चेल्लो शो' या गुजराती चित्रपटाची ऑस्करसाठी निवड

आरआरआर, काश्मीर फाइल्स, गंगूबाई काठियावाडी या चित्रपटांना टाकेल मागे
Chhello Show Oscars Entry: 'चेल्लो शो' या गुजराती चित्रपटाची ऑस्करसाठी निवड

'चेल्लो शो' (Chhello Show) या गुजराती चित्रपटाची ची 95 व्या अकादमी ऑस्कर पुरस्कारांसाठी (95 Oscars Academy Awards) निवड करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी या चित्रपटाची निवड करण्यात आलीय. आरआरआर, काश्मीर फाइल्स, गंगूबाई काठियावाडी या चित्रपटांची नावे गाजत असताना, सर्व चित्रपटांना मागे टाकत 'चेल्लो शो' हा गुजराती चित्रपट (Gujarati movie Chhello Show) ऑस्कर पुरस्कारांसाठी पात्र ठरला आहे.

पान नलिन दिग्दर्शित 'चेल्लो शो' चित्रपटात भाविन रबारी, भावेश श्रीमाली, ऋचा मीना, दिपेन रावल आणि परेश मेहता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 2021 मध्ये ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला. ऑक्टोबर 2021 मध्ये, चेल्लो शोने 66 व्या वॅलाडोलिड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोल्डन स्पाइक पुरस्कार जिंकला.

Chhello Show Oscars Entry: 'चेल्लो शो' या गुजराती चित्रपटाची ऑस्करसाठी निवड
Goa Forward Party : गोवा फॉरवर्डचा ‘नारळ’ लवकरच कॉंग्रेसच्या हातात

'चेल्लो शो' ही चित्रपटाच्या दुनियेत वावरणाऱ्या एका लहाण मुलाची कथा आहे. त्याला चित्रपट बनवायचा आहे, त्याला चित्रपटाच्या दुनियेत काम करायचे आहे आणि तो त्याच्या ध्येयापर्यंत कसा पोहोचतो, अशी 'चेल्लो शो' या चित्रपटाची कथा आहे. चेल्लो शो चित्रपटाची ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर स्थान मिळवल्यानंतर सिनेक्षेत्रातून अनेकांच्या अभिनंदनपर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com