असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ अॅस्ट्रॉनॉमी’ (गोवा) ने आयोजित केलेला ‘खगोल फिल्म फेस्ट 2022’ गुरुवार 13 जानेवारी 2022 ते शनिवार 15 जानेवारी 2022 या काळात, सायंकाळी 7 ते 9 या दरम्यान जुंता हाऊस, पणजी (Panji) येथील खगोलशास्त्रीय वेधशाळेत पार पडेल. या महोत्सवात (Festival) ‘अरायव्हल’, ‘झोडियाक: सायन ऑफ द अॅपोकलिप्स’ व ‘दि डार्केस्ट हवर’ हे ब्लॉकबस्टर स्पेस फिक्शन चित्रपट (Movie) प्रदर्शित केले जातील. या वर्षी, प्रत्येक दिवशी, सामाजिक अंतराच्या बंधनामुळे, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर, अत्यंत मर्यादित जागा उपलब्ध असतील. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून नोंदणी अनिवार्य आहे.
अरायव्हल:
हा 2016 मधील अमेरिकन सायन्स फिक्शन ड्रामा चित्रपट (Movie) आहे., जेव्हा एक रहस्यमय अंतराळयान या जगाच्या अंतराळाला स्पर्श करते, तेव्हा एक टिम, तज्ज्ञ अनुवादक लुईस बँक्स (अकादमी पुरस्कार नामांकित एमी अॅडम्स) यांच्या नेतृत्वाखाली - त्यांच्या हेतूचा उलगडा करण्यासाठी वेळेच्या विरोधात काम करते. 1 सप्टेंबर 2016 रोजी व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड प्रीमियर झालेल्या ‘अरायव्हल’ ला अकादमी पुरस्कारांमध्ये आठ नामांकने मिळाली होती. ‘अरायव्हल’ कोणत्याही राजकीय अंगांपेक्षा भाषा, कल्पनाशक्ती आणि खोल मानवी नातेसंबंधांबद्दलच्या सत्यांशी संबंधित आहे. भाषाशास्त्र, रूपक आणि परग्रहवासीयांवर आधारलेला ‘अरायव्हल’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे.
दिग्दर्शक : डेनिस विलेन्यूव्ह
झोडियाक: सायन्स ऑफ द अॅपोकलिप्स’:
हा 2014 चा कॅनेडियन सायन्स फिक्शन डिझास्टर टेलिव्हिजन चित्रपट आहे. एक रहस्यमय ग्रह सूर्याला ओलांडतो आणि जागतिक आपत्ती सुरू होतात. या आपत्तींच्या मालिकेमुळे होऊ पाहणारा ग्रहाचा नाश टाळण्यासाठी एक अपारंपरिक शास्त्रज्ञ काही चिन्हांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतो. हाच बदमाश शास्त्रज्ञ आता यातल्या प्रतिकांचा उलगडा करण्याची गुरुकिल्ली बनलेला आहे आणि त्यातच मानवतेला जगण्याची एकमेव संधीही आहे.
दिग्दर्शक : डब्लू. डी. होगन
दि डार्केस्ट हवर:
मॉस्कोमध्ये, तिथल्याच वीज पुरवठ्याद्वारे पृथ्वीवर हल्ला करणाऱ्या एलियनविरुद्ध पाच तरुण लढा देतात. या चित्रपटात एमिल हिर्श, मॅक्स मिंगेला, ऑलिव्हिया थर्ल्बी, रॅचेल टेलर आणि जोएल किन्नमन हे आक्रमणात अडकलेल्या लोकांच्या गटाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 25 डिसेंबर 2011 रोजी अमेरिकेत प्रदर्शित झाला होता. 35 दशलक्ष डॉलर्स बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 65 दशलक्ष डॉलर्स कमावले आहेत.
दिग्दर्शक; क्रिस गोराक
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.