Gandhi Jayanti 2022: बापुंजींच्या आयुष्यावर आधीरित ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

Gandhi Jayanti 2022: भारताला स्वातंत्र्य देण्यात गांधीजींचे खुप मोठे योगदान आहे.
Gandhi Jayanti 2022
Gandhi Jayanti 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

दरवर्षी २ ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती (Gandhi Jayanti 2022) साजरी केली जाते. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर, गुजरात येथे झाला. या वर्षी आपण गांधीजींची 153वी जयंती साजरी करत आहोत. भारत देशाला स्वातंत्र्य देण्यास गांधीजींनी मोलाचे योगदान दिले आहे. बॉलिवूडनेही (Bollywood) गांधीजींच्या स्मरणार्थ अनेक चित्रपट बनवले आहेत. चला तर मग पाहुया हि चित्रपटे कोणती आहेत.

  • हे राम (Hey Ram)

    कमल हासन, नसीरुद्दीन शहा अभिनीत ‘हे राम’ हा चित्रपट भारताची फाळणी आणि नथुराम गोडसेने केलेली गांधींची हत्या याभोवती फिरतो. 'हे राम' मधील नसीरुद्दीन शहांच्या गांधी लूकला विशेष दाद मिळाली नाही. परंतु, त्यांच्या अभिनयासाठी आणि गुजराती संवादफेकीबद्दल त्यांचे अधिक कौतुक झाले.

  • गांधी माय फादर (Gandhi My Father)

    ‘गांधी माय फादर’ हा चित्रपट महात्मा गांधी आणि त्यांचा मुलगा हिरालाल गांधी यांच्यात असलेल्या नातेसंबंधांवर आधारित आहे. या चित्रपटात दर्शन जरीवाला ‘महात्मा गांधी’च्या तर, अक्षय खन्ना ‘हिरालाल गांधी’च्या भूमिकेत झळकले होते. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

  • द गांधी मर्डर (The Gandhi Murder)

    2019मध्ये रिलीज झालेला 'द गांधी मर्डर' हा एक ऐतिहासिक-राजकीय थ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन करीम ट्रेडिया आणि पंकज सहगल यांनी केले होते. हा संपूर्ण चित्रपट महात्मा गांधींच्या जीवनातील शेवटच्या काळावर केंद्रित आहे. या चित्रपटात महात्मा गांधी यांची हत्या चित्रित करण्यात आली आहे.

Gandhi Jayanti 2022
Sanjay Dutt: मुन्नाभाईने दिल्या गांधी जयंतीच्या शुभेच्छा; पाहा video
  • गांधी (Gandhi)

    महात्मा गांधीजींच्या आयुष्यावरील या चित्रपटात ब्रिटिश अभिनेता बेन किंग्सले मुख्य भूमिकेत झळकले होते. 1982मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रिचर्ड अॅटनबरो यांनी केले होते. या चित्रपटाला 8 ऑस्कर पुरस्कार मिळाले. ‘गांधी’ हा चित्रपट महात्मा गांधीजींच्या जीवनावर बनवलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे.

  • द मेकिंग ऑफ महात्मा गांधी (The Making Of Mahatma Gandhi)

    श्याम बेनेगल यांच्या ‘द मेकिंग ऑफ महात्मा गांधी’ या चित्रपटात अभिनेता रजत कपूरने गांधीजींची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात महात्मा गांधींच्या आयुष्यातील ती 21 वर्षे दाखवण्यात आली आहेत, जी त्यांनी दक्षिण आफ्रिकेत घालवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com