Gadar 2: रिलिजपुर्वीच तारा सिंह अन् सकिनाच्या 'गदर 2' साठी आनंदाची बातमी....

तारा सिंह अन् सकिना यांच्या 'गदर 2' ला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळाले आहे.
Gadar 2:
Gadar 2:Dainik Gomantak
Published on
Updated on

Gadar 2 Latest Update: सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या 'गदर 2' चित्रपटाची क्रेझ रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. 'गदर: एक प्रेम कथा' या पहिल्या चित्रपटाच्या 22 वर्षांनंतर सनी आणि अमिषा दुसऱ्या भागासाठी रुपेरी पडद्यावर एकत्र आले आहेत. 

'गदर 2' या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाने चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा सुरू केली आहे. दरम्यान, 'गदर 2' नुकताच भारतीय लष्करासाठी प्रदर्शित करण्यात आला होता.

'गदर 2' च्या टीमने भारतीय सैन्याकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळावे म्हणून हा चित्रपट दाखवला होता. संरक्षण मंत्रालयाच्या प्रिव्ह्यू कमिटीने गदर 2 ला फक्त हिरवी झेंडी दिली नाही तर चित्रपटाची प्रशंसा करणारे सकारात्मक प्रतिक्रीयाही दिली आहे.  

भारतातील कोणत्याही लष्करावर आधारित चित्रपटासाठी, प्रदर्शनापूर्वी संरक्षण मंत्रालयाच्या पूर्वावलोकन समितीकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेणे आवश्यक आहे. त्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन केले होते आणि त्यांना अधिकाऱ्यांकडून मिळालेला प्रतिसाद जबरदस्त होता. मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्रालयाच्या पूर्वावलोकन समितीने कोणताही मुद्दा न मांडता चित्रपटाला मंजुरी दिली आहे.

गदर मधील हे गाणे रिक्रिएट केले असून हे सुपरहिट गाणे प्रेक्षकांना २२ वर्षापूर्वीच्या काळात घेऊन जाईल. तारा सिंग आणि सकीनाची केमिस्ट्री प्रेक्षकांना पून्हा एकदा भूरळ घालताना दिसत आहे. गाणे प्रदर्शित झाल्यापासून सोशल मिडिया( Social Media) वर ट्रेडिंग होताना दिसत आहे.

Gadar 2:
3 Idiots: 'थ्री इडियट्स'चा सिक्वेल येणार? अभिनेता म्हणाला आमिरसोबत पून्हा काम करण्यास...

चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर सनी आणि अमिषासोबत उत्कर्ष शर्माही चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा टीझर आणि एक गाण यापूर्वीच लाँच करण्यात आले आहे. ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. निर्माते लवकरच 'गदर 2' चा ट्रेलर प्रेक्षकांसाठी लाँच करणार आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com