Gadar 2: सनी देओलचा आगामी चित्रपट 'गदर 2' ला सेन्सॉर बोर्डाने UA प्रमाणपत्र दिले आहे. चित्रपटात एकूण 10 कट करण्यात आले आहेत, त्यानंतर निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाकडून हे प्रमाणपत्र मिळवण्यात यश आले.
दंगलीचे दृश्य ज्यामध्ये लोकांना 'हर हर महादेव'चा जयघोष करताना दाखवण्यात आले होते, ते चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे, तर 'शिव तांडव'चे दृश्यही बदलून त्याऐवजी 'अखंड है.. वो वो संग है' असे गाणे देण्यात आले आहे. त्याचबरोबर शिव्या असणारा भागही हटवण्यात आला आहे.
याशिवाय, जिथे 'तिरंगा' हा शब्द वापरला जात होता, तो बदलून 'ध्वज' करण्यात आला आहे. वृत्तानुसार, चित्रपटाचे (Movie) इतर अनेक संवाद देखील बदलण्यात आले आहेत, ज्यात भगवद्गीता आणि कुराणचा संदर्भ असलेल्या संवादाचा समावेश आहे.
TOI च्या रिपोर्टनुसार, चित्रपटात एका ठिकाणी संरक्षण मंत्र्यांना चुकीचे संबोधित करण्यात आले होते, जे बदलून 'रक्षा मंत्री' करण्यात आले आहे.
चित्रपटात अशी काही दृश्ये आहेत, ज्यासाठी सेन्सॉर बोर्डाने डॉक्यूमेंट्री प्रूफ मागितले आहेत. यामध्ये 1971 च्या भारत (India) -पाक युद्धासह अनेक दृश्यांचा समावेश आहे. यामध्ये मंत्र आणि श्लोकांच्या जपाच्या काही दृश्यांचाही समावेश आहे.
या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डापुढे ए प्रमाणपत्र मिळत होते, परंतु निर्मात्यांना त्यांचा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असे वाटत होते.
आता अनेक सीन्स कापल्यानंतर अखेर निर्मात्यांना यूए प्रमाणपत्र मिळाले आहे. एडिटिंगनंतर, चित्रपटाचा एकूण रनटाइम आता 2 तास 50 मिनिटे आहे.
OMG-2 आणि गदर-2 हे दोन्ही चित्रपट एकाच तारखेला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहेत. दोन्ही चित्रपटांबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
'गदर-2'चा ट्रेलर आधीच रिलीज झाला असतानाच प्रेक्षक ओएमजी-2च्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर आता 3 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.