KGF chapter 2 News
KGF chapter 2 NewsDainik Gomantak

'KGF Chapter 2'चा ब्रिटनमध्येही बोलबाला

12 तासांत 5000 तिकीटांची विक्री
Published on

'RRR' चित्रपटानंतर, दक्षिण सुपरस्टार यशच्या 'KGF Chapter 2' ची सर्वत्र चर्चा आहे. चाहते या चित्रपटसाठी उत्सुक आहेत. तब्बल तीन वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होत आहे. (five thousand tickets of KGF Chapter 2 sold in England)

KGF chapter 2 News
Ranbir-Alia Wedding: 'रणबीर-आलिया'च्या लग्नात 'या' कलाकारांना 'नो एन्ट्री'

'KGF Chapter 2' अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या तिकीटांची झपाट्याने विक्री होत आहे, 'KGF Chapter 2' 14 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. यासोबतच थलपथी विजयचा 'बीस्ट' चित्रपट आणि शाहिद कपूर-मृणाल ठाकूर यांचा 'जर्सी' चित्रपटही (Movie) प्रदर्शित होत आहेत. तिन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर (Box Office) चुरशीची स्पर्धा होणार आहे. या वळणावर थलपथी विजय आणि शाहिद कपूर यशला टक्कर देताना दिसतील. यशच्या चित्रपटाचे बुकिंग 7 एप्रिल रोजी BookMyShow वर सुरू करण्यात आले आहे. (KGF chapter 2 News)

KGF chapter 2 News
सारा अली खानची आवडती डिश जाणून व्हाल थक्क!

आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) आणि तेलंगणामध्ये या चित्रपटाचे बुकिंग 10 एप्रिलपासून सुरू होणार आहे. परदेशातही या चित्रपटाची तिकिटे विकली जात आहेत. ब्रिटनमध्ये 12 तासांत या चित्रपटाची पाच हजार तिकिटे विकली गेली आहेत. 'KGF Chapter 2' या चित्रपटात रवीना टंडन आणि संजय दत्त देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचा एक निष्ठावंत चाहता वर्ग आहे. या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com