'Pushpa 2' First Look Poster Breaks Records
'Pushpa 2' First Look Poster Breaks RecordsDainik Gomantak

Pushpa 2 Breaks Records: रिलीज होण्याआधीच 'पुष्पा 2'चा नवा विक्रम; फर्स्ट लूक पोस्टरला 7 मिलीयन लाईक्स

सुपर-डुपर हिट सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे
Published on

First Look Poster Of Allu Arjun In 'Pushpa 2' Breaks Records : 2021 मध्ये प्रदर्शित झालेला ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती.

या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा पार केला होता. या सुपर-डुपर हिट सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे.

पुष्पाच्या भूमिकेत असलेला अल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2' सिनेमाने प्रदर्शित होण्याआधीच एक नवा विक्रम केला आहे.

या सिनेमाच्या पोस्टरला इन्स्टाग्रामवर सात मिलियनपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. सात मिलियनपेक्षा जास्त लाईक्स मिळणारे पहिले भारतीय चित्रपटाचे पोस्टर ठरले आहे.

'Pushpa 2' First Look Poster Breaks Records
Dabolim Airport : दाबोळी विमानतळानजीक कॉंक्रिट मिक्सर ट्रकचा अपघात

याबाबतची माहिती पुष्पाच्या निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

7 एप्रिलला 'पुष्पा 2'चा पोस्टर रिलीज करण्यात आला होता. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जूनने साडी परिधान केलेली दिसत आहे.

‘पुष्पा 2’मध्ये अल्लू अर्जुन, फहाद फासिल, रश्मिका मंदाना, साई पल्लवी यांची भूमिका असेल. 'पुष्पा 2' सुकुमार यांनी दिग्दर्शीत केला आहे.

पुष्पा 2 चे शूटिंग यावर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत संपणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com