यंदाच्या 52व्या इफ्फीत (IFFI 2021) समंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) या दाक्षिणात्य अभिनेत्रीला वक्ता म्हणून निमंत्रित करण्यात आलेले आहे. दक्षिणेकडच्या एखाद्या अभिनेत्रीला हा मान पहिल्यांदाच लाभतो आहे. इतर वक्ते आहेत, दिग्दर्शिका अरुणा राजे, अभिनेते जॉन इदाथात्तिल, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेते मनोज बाजपेयी.
अमेझॉन प्राईमवर दाखवण्यात येणाऱ्या ‘द फॅमिली मॅन 2’ या वाहिनीमधून सध्या समंथा एका भूमिकेत दिसते आहे. सिनेमा थिएटरमधून तिचा सिनेमा प्रदर्शित झालेल्याला एक वर्षापासून अधिक काळ लोटलेला आहे. ‘शाकुंतलम’ हा गुणाशंकर यांनी दिग्दर्शित केलेला आपला चित्रपट प्रदर्शित व्हायची वाट ती पाहते आहे.
‘काथुवाकुला रेंडू काढल’ हा तिची भूमिका असलेला चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे तिने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले. तिने हरी आणि हरीश या दिग्दर्शक द्वयींबरोबर आणि दिग्दर्शक शांथरुबन यांच्याबरोबर तामिळ आणि तेलगू सिनेमा साईन केले आहेत.
यंदाच्या इफ्फीत (52IFFI) इराणी सिनेमा दिग्दर्शिका रख्शान बॅनिएतेमद ह्या ज्युरी मंडळाच्या अध्यक्षा असणार आहेत. एक पटकथाकार, निर्मात्या आणि दिग्दर्शिका म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची ख्याती आहे. जगभरच्या समिक्षकांनी आणि चित्रपट रसीकांनी त्यांचे चित्रपट वाखाणलेले आहेत. ‘फर्स्ट लेडी ऑफ इराणी सिनेमा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रख्शान राजकारण आणि घर यामधला सामाजिक आयाम आपल्या चित्रपटांमधून सखोलतेने मांडतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.