Fighter Box Office Collection: हृतिक-दीपिकाच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर डंका

Fighter Box Office Collection: म्हणजेच या चित्रपटाने पहिल्या दिवशी परदेशात 8 कोटी रुपये कमावले असून भारतात एकूण 27.00 कोटी रुपये कमावले आहेत
Fighter Box Office Collection
Fighter Box Office CollectionDainik Gomantak
Published on
Updated on

Fighter Box Office Collection: २५ जानेवारी २०२४ ला हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार प्रेक्षकांसाठी फायटर सिनेमा घेऊन हजर झाले आहेत. पहिल्याच दिवशी या सिनेमाने मोठी कमाई करत चांगली सुरुवात केली होती. आता दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर किती कमाई केली आहे, हे जाणून घेऊयात.

या चित्रपटाने ओपनिंगनंतर दुसऱ्या दिवशी पहिल्या शुक्रवारी ओपनिंगपेक्षा खूप जास्त कमाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 39.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात 22.5 कोटींची कमाई केली. जगभरात या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३५ कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच या चित्रपटाने पहिल्या दिवशी परदेशात 8 कोटी रुपये कमावले असून भारतात एकूण 27.00 कोटी रुपये कमावले आहेत. एकूणच, चित्रपटाने दोन दिवसांत देशभरात 61.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

प्रेक्षक या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करताना दिसत आहे. यातील अॅक्शनसीन लोकांना भूरळ पाडत असून कलाकारांनी देखील त्यांच्या पात्राला आपल्या अभिनयाने न्याय दिल्याचे म्हटले जात आहे. सुमारे 250 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट देशभरातील 4200 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 2D, 3D, IMAX 3D, 4DX 3D, ICE 3D आणि IMAX 2D सारख्या स्क्रीनचा समावेश असलेल्या अनेक भिन्न आवृत्त्यांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी म्हणजेच २५ जानेवारी २०२३ ला शाहरुख आणि दीपिकाचा पठाण चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर यावर्षी त्याच दिवशी म्हणजेच २५ जानेवारी २०२४ हृतिक आणि दीपिकाचा फायटर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या दोन चित्रपटांच्या कमाईची तुलना केली जात आहे. पठाणने पहिल्या दिवशी 57 कोटींची जबरदस्त ओपनिंग केली होती, तर 'फायटर'ने 22.5 कोटींची ओपनिंग केली आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com