दाक्षिणात्या सुपस्टार प्रभासच्या चाहत्याने गळफास लावून केली आत्महत्या

टिळक नगर, आंध्र प्रदेश येथे राहणारा मुथला रवी तेजा, 24 या चाहत्याने केली आत्माहात्या
Prabhas
PrabhasDainik Gomantak
Published on
Updated on

तेलुगू सुपरस्टार प्रभासचे करोडो चाहते आहेत. त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असणारे काहीजण आहेत. प्रभासचा नुकताच प्रदर्शित झालेला 'राधे श्याम' चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. या चित्रपटाबद्दल त्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली असुन; हा चित्रपट प्रेक्षक वर्गाला प्रभावित करण्यात अपयशी ठरला आहे. (Fan of southern superstar Prabhas commit suicide by hanging)

Prabhas
Holi Special Song: बॉलीवुडमधील 'ही' आहेत प्रसिद्ध गाणी

पण प्रभासचे (Prabhas) असे काही चाहते आहेत जे 'राधे श्याम'चे नकारात्मक रिव्ह्यू सहन करू शकत नाहीत. यासंदर्भातील एक दुःखद घटना सोमवारी उघडकीस आली. प्रभासच्या 24 वर्षीय डाय हार्ट फॅनने पंख्याला गळफास लावून घेतला. प्रभासच्या एका चाहत्याने आत्महत्या केल्याचे वृत्त बॉलिवूड लाईफने दिले आहे. टिळक नगर, कुर्नूल, आंध्र प्रदेश येथे राहणारा मुथला रवी तेजा, 24, 'राधे श्याम'ला नकारात्मक रिव्ह्यू मिळत असल्याने नाराज झाला होता.

रिपोर्टनुसार, तेजाने पहिल्याच दिवशी हा चित्रपट (Movie) पाहिला होता आणि चित्रपट त्याच्या अपेक्षेप्रमाणे झाला नसल्याचे कुटुंबियांना सांगितले होते. त्याचे प्रभासवर इतके प्रेम होते की, तो चित्रपटाच्या नकारात्मक रिव्ह्यूने नाराज झाला होता. पेशाने वेल्डर असलेल्या या फॅनने अखेर पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

साऊथमध्ये फिल्मस्टारची खूप क्रेझ आहे. याआधीही प्रभासच्या एका चाहत्याने राधे श्यामच्या रिलीजबाबत कोणतीही अपडेट न मिळाल्याने सुसाईड नोट लिहिली होती. मात्र तो बचावला. चित्रपटाने 3 दिवसात 151 कोटी कमावले, 'राधे श्याम'ने ओपनिंग वीकेंडमध्येच 151 कोटी कमावले आहेत. 3 दिवसात या चित्रपटाने जगभरात 151 कोटींचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट हिंदी बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. ट्रेड अ‍ॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते, चित्रपटाने हिंदी बॉक्स ऑफिसवर केवळ 14 कोटींचा व्यवसाय केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com