HBD: इश्क ने गालिब निकम्मा कर दिया...

आजही रसिकांना गालिबवर बनवलेले लघुपट पाहायला आवडतात.
Mirza Ghalib

Mirza Ghalib

Dainik Gomantak

Published on
Updated on

महान शायर मिर्झा गालिबला (great shayari Mirza Ghalib) ओळखीची गरज नाही. त्यांचे शेर आजही लोकांच्या ओठांवर आहेत. त्यांची कविता आणि त्यांचे नाव आजही जिवंत आहे. गालिब यांचा जन्म 27 डिसेंबर 1796 रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra) येथे झाला. गालिबला त्याच्या शेर-ओ-शायरीने सर्वत्र ओळख मिळाली आहे.

<div class="paragraphs"><p>Mirza Ghalib</p></div>
सलमान खानला एकदा नव्हे तर तीन वेळा चावला होता साप

गालिबच्या जीवनावर अनेक पुस्तके लिहिण्याबरोबरच चित्रपटही (Movie) बनले आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या जीवनावर एक टीव्ही सीरियलही बनवण्यात आली होती. इतकंच नाही तर गालिबच्या जीवनावर अनेक लघुपटही (Short film) बनवण्यात आले आहेत. तर आज मिर्झा गालिब (Mirza Ghalib) यांचा वाढदिवस (Birthday) आहे.

1954 मध्ये मिर्झा गालिब यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट पहिल्यांदा बनला होता. या चित्रपटात अभिनेता भारत भूषण नजप आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सोहराब मोदी यांनी केले होते. या चित्रपटात भारत भूषणसोबत अभिनेत्री सुरैया दिसली होती. हा चित्रपट प्रक्षकांना खूप आवडला होता आणि आजही त्या चित्रपटाचे चाहते दिसून येतात. मिर्झा गालिब यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने सर्वांची मने जिंकली आहेत.

<div class="paragraphs"><p>Mirza Ghalib</p></div>
सनी लिओनीच्या 'मधुबन में राधिका नाचे' या गाण्याचे बदलणार बोल

लोकांना गालिब खूप आवडला होता. त्यामुळे त्यांच्या जीवनावर चित्रपटासोबत एक मालिकाही बनवण्यात आली होती. या मालिकेत नसीरुद्दीन शाह गालिबच्या भूमिकेत दिसून आले होते. या शोच्या प्रत्येक भागाची, चाहते आतुरतेने वाट पाहत होते. गुलजार यांनी हा शो लिहिला होता. या शोची खास गोष्ट म्हणजे यात जगजीत सिंग यांनी गायलेल्या गझलही दाखवण्यात आल्या होत्या. नसीरुद्दीन शाह यांच्या करिअरसाठी हा शो खूप चांगला ठरला.

गालिबला भारताबरोबरच पाकिस्तानातही (Pakistan) खूप आवडते. त्यांच्या जीवनावर पाकिस्तानातही चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटात अभिनेता सुधीर मुख्य भूमिकेत दिसला होता. पाकिस्तानातही हा चित्रपट खूप आवडला होता. हा चित्रपट 1961 साली प्रदर्शित झाला होता. मिर्झा गालिब यांच्या जीवनावर अनेक लघुपटही बनवण्यात आले आहेत, जे इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत. आजही रसिकांना गालिबवर बनवलेले लघुपट पाहायला आवडतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com