ED Questioned Vijay Deverakonda: साउथ सुपरस्टार विजय देवरकोंडा ED च्या रडावर, 9 तास चौकशी

साउथ सुपरस्टार विजय देवरकोंडा याची हैदराबादमध्ये ईडीने त्याच्या 'लिगर' चित्रपटाच्या फंडींगबाबत चौकशी केली.
Vijay Deverakonda
Vijay DeverakondaDainik Gomantak
Published on
Updated on

साउथ सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांची ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. अलीकडेच रिलीज झालेल्या 'लायगर' या चित्रपटासाठी FEMA (फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्टर) च्या चौकशीच्या संदर्भात ईडीने हैदराबादमध्ये त्यांची चौकशी केली होती. हैदराबादमध्ये देवरकोंडा यांना 9 तासांपेक्षा जास्त चौकशी करण्यात आली होती.

देवरकोंडा यांनी सर्व प्रश्नाचे उत्तर दिल्याचा दावा केला आहे. चौकशीला त्याच्या चाहत्यांच्या प्रेमाचा "साइड इफेक्ट" आणि "समस्या" म्हणून संबोधले. ते म्हणाले, "तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमामुळे आणि आपुलकीमुळे काही समस्या आणि दुष्परिणाम होतील. पण हा एक अनुभव आहे आणि हे जीवन आहे. मला बोलावले तेव्हा मी माझे कर्तव्य केले आहे. मी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत." जेव्हा त्यांना विचारण्यात आले की तुम्हाला पुन्हा बोलावले जाईल का, तेव्हा त्याने नकारार्थी उत्तर दिले.

या चित्रपटाच्या दिग्दर्शकावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.गेल्या काही महिन्यांपासून 'लाइगर' चित्रपटाच्या फंडींगबाबत अनेक शंका आहेत. ईडीने अलीकडेच डायरेक्टर पुरी जगन्नाथ आणि बिझनेस पार्टनर चार्मी कौर यांची जवळपास 12 तास चौकशी केली होती.

  • ' Liger' बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नाही

लाइगर 'Liger' हा एक स्पोर्ट्स अॅक्शन ड्रामा चित्रपट होता. जो मुख्यतः अमेरिकेत 125 कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेटमध्ये शूट करण्यात आला होता. या चित्रपटात माजी जागतिक हेवीवेट चॅम्पियन माईक टायसन देखील होते. पण, रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट (Movie) अपयशी ठरला. संपूर्ण भारतातील चित्रपट म्हणून रिलीज होऊनही, लीगरने भारतीय बॉक्स ऑफिसवर आपल्या बजेटपेक्षा कमी कमाइ केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com