मार्व्हल स्टूडियोजचा 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस' (Doctor Strange In The Multiverse Of Madness) चित्रपट 6 मे रोजी रिलीज होणार आहे. ‘डॉक्टर स्ट्रेंज’ हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने 'ओपनिंग-डे' ला 8.5 कोटी डॉलरची कमाई केली होती. आता या चित्रपटाचा (Movie) सिक्वेल म्हणजेच 'डॉक्टर स्ट्रेंज-2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्री-बुकींगला देखील सुरूवात झाली आहे.
'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ या चित्रपटाच्या प्री-बुकींला सुरूवात झाल्यानंतर या चित्रपटानं अॅडवान्स बुकींगमधून 19 कोटी डॉलरची कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. त्यामुळे हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करू शकतो. 6 मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची तारीख समोर आल्यामुळे प्रेक्षकांमद्धे उत्सुकता अधिक वाढली आहे.
'डॉक्टर स्ट्रेंज 2’ म्हणजेच ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ हा चित्रपट अमेरिकेसोबतच भारतामध्ये 6 मे रोजी रिलीज होणार आहे. भारतामध्ये (India) हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.