'सावळा रंग' चित्रपट मिळवण्यात अडचण; 'या' अभिनेत्रीने केला खुलासा

'टीव्ही इंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीची अभिनेत्री जरीना वहाब (Zarina Wahab) आज त्यांचा वाढदिवस साजरा लकरत आहेत.
Zarina Wahab
Zarina WahabDainik Gomantak
Published on
Updated on

'टीव्ही इंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीची अभिनेत्री जरीना वहाब (Zarina Wahab) आज वाढदिवस साजरा करत आहेत. 80 च्या दशकामध्ये ह्रदयावर राज करणाऱ्या या अभिनेत्रीने आपल्या अफलातून अभिनयाने प्रक्षेकांची मने जिंकली. चंदेरी पडद्यावर कधी आई तर कधी सासू बनून त्या रसिकांच्या भेटीला आल्या. त्या प्रसिध्द अभिनेता आदित्य पांचोली (Aditya Pancholi) यांच्या पत्नी आणि अभिनेता सूरज पांचोली (Suraj Pancholi) यांच्या आई आहेत.

जरीना वहाब यांचा जन्म 17 जुलै 1959 मध्ये आध्रंप्रदेशमधील विशाखापट्टणममध्ये (Visakhapatnam) झाला. त्यांनी हिंदी आणि इंग्रजी त्याचबरोबर उर्दू आणि तेलुगु सारख्या कित्येक चित्रपटामधून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया मधून जरिना वहाब यांनी शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला. अभिनेत्री वहाब ज्यावेळी बॉलिवूडमध्ये संघर्ष करत होत्या त्यावेळी त्यांच्या सावळ्या रंगामुळे अनेकवेळा चांगल्या चांगल्या भूमिका मिळवण्यापासून वंचित रहावे लागले. त्यांना फक्त त्यांच्या सावळ्या रंगामुळे चित्रपटामध्ये घेण्यात येत नसत.

Zarina Wahab
अक्षय कुमार- नुपुर च्या 'फिलहाल 2' सॉन्गला चाहत्यांची चांगलीच पसंती

सगळ्यात पहिला चित्रपट अभिनेत्री जरिना वहाब यांचा इश्क इश्क इश्क हा होता. प्रसिध्द अभिनेते देवा आनंद त्यांच्या या चित्रपटासाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधामध्ये होते. हे जरिन यांना ज्यावेळी समजलं त्यावेळी त्यांनी त्वरित चित्रपटासाठी ऑडिशन दिले. या चित्रपटामध्ये जरीना वहाब यांना अभिनेत्री जीनत अमान यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपला जलवा दाखवू शकला नाही.मात्र जरीना वहाब यांना या चित्रपटाने ओळख मिळाली. त्यांच्यासमोर नव नव्या सिनेमांच्या रांगा लागू लागल्या. त्यानंतर त्यांनी घरौंदा, सावन को आने दो, अनपढ, नैया, सितारा आणि तडप या सारख्या चित्रपटामध्ये काम केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com