Dia Mirza Viral Video: “मी दिया मिर्झा शपथ घेते की…” मराठी अंदाजात केला पतीचा स्वीकार, पाहा व्हिडिओ

लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिया मिर्झाने तिच्या लग्नाची एक खास झलक चाहत्यांसह शेअर केली आहे.
Dia Mirza Viral Video
Dia Mirza Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवुडमधील प्रसिध्द अभिनेत्री दिया मिर्झा ही तिच्या चित्रपटापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. पहिल्या लग्नानंतर तिने वर्षभरातच घटस्फोट घेतला. त्यानंतर 2021 साली तिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली.आज तिच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस आहे. यानिमित्त तिने तिच्या लग्नाची एक खास झलक चाहत्यांसह सोशल मिडियावर शेअर केली आहे.

दिया मिर्झा आणि वैभव रेखी यांनी 15 फेब्रुवारी 202 रोजी लग्नगाठ बांधली. यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच व्हायरल झाले होते. त्या दोघांनी कुटुंबीय, त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत रजिस्टर पद्धतीने लग्न केले. आता त्यांच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला तिने या लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड चर्चेत आला आहे त्याचे कारण म्हणजे या लग्नात तिने मराठीतून शपथ घेतली होती.

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मोजक्याच लोकांमध्ये पण अत्यंत उत्साहात त्यांचे लग्न झालेले दिसत आहे. यात ते दोघे एकमेकांना अंगठी घालताना दिसत आहेत, वैभव दियाच्या भांगेत सिंदूर भरताना आणि तिला मंगळसूत्र घालताना दिसत आहे, तर ते दोघे एकत्र मॅरेज सर्टिफिकेटवर सही करताना दिसत आहेत.

या व्हिडीओच्या शेवटी दोघांनीही आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली आहे. वैभवने ही शपथ इंग्रजीमध्ये घेतली तर दियाने मराठी भाषेमधून घेतली आहे. अडखळत तिने मराठीत लिहिलेली शपथ वाचली आणि वैभवचा पती म्हणून स्वीकार केला. यामुळे दियाने मराठी भाषा बोलल्याने सर्वांचे लक्ष वेधले असून व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

दियाचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनी दियाच्या मराठी बोलण्याचंही कौतुक केले आहे. हा व्हिडीओ आता सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com